File photo 
मराठवाडा

खूशखबर...! अर्थसंकल्पात माहूर गडाच्या विकासासाठी निधीची तरतूद

बालाजी कोंडे

माहूर (जि. नांदेड) : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक पुर्णपीठ असलेल्या माहूरगड विकासाकरिता निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली.  शुक्रवारी (ता. सहा मार्च २०२०) राज्याचे अर्थमंत्री अजीत पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. विकास निधीची घोषणा झाल्याने माहूरमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

शुक्रवार ठरला आनंदाचा दिवस
माहूरकरांसाठी शुक्रवारचा दिवस आनंदचा ठरला. २०१६-१७ यावर्षी माहूर तिर्थक्षेत्र विकासाचा सुधारीत दोनशे सोळा कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यास मंत्रीमंडळाची मंजुरीही देण्यात आली होती. पण गेल्या चार वर्षात केवळ दोन कोटी रूपये निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे तुटपुंज्या निधीमुळे विकास रखडला होता. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी माहूर तिर्थक्षेत्र विकास कामाची उच्चस्तरिय बैठक विधानभवन मुंबई येथे नुकतीच घेऊन आढावा घेतला होता.

‘या’ तीर्थक्षेत्रांचा आहे समावेश
शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात नांदेड जिल्हयातील श्रीक्षेत्र माहूर, बीड जिल्ह्यातील पळी वैजनाथ, हिंगोली जिल्हयातील औंढा नागनाथ, नर्सी नामदेव, पाथरी( जि.परभणी), प्राचीन शिवमंदीर अंबरनाथ, हजरत ख्वाजा शमनामिरा दर्गा मिरज या निर्थक्षेत्राच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली आहे.

कामे लवकर व्हावीत
माहूरच्या नागरिकांची, भाविकांची मागणी पुर्ण झाली आहे. राज्य शासनाने कमी वेळेत विकास निधी उपलब्ध करून दिल्याबदल अभिनंदन व आभारय लवकरात लवकर कामे सुरू व्हावीत, हीच अपेक्षा
- चंद्रकांत भोपी (विश्वस्त, श्री रेणुकादेवी संस्थान विश्वस्त समिती, श्रीक्षेत्र माहूर)

राज्य शासनाचे अभिनंदन
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी माहूर तिर्थक्षेत्र विकास कामाकरिता निधी उपलब्ध व्हावा म्हणून पाठपुरावा केला होता. त्यांना निधी मिळविण्यात यश आले. त्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन
- राजेंद्र केशवे (माजी सदस्य, माहूर तिर्थक्षेत्र विकास प्राधिकरण, माहूर गड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT