Tuljapur News 
मराठवाडा

तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला आल्या अन् हरवलेली पर्स तब्बल दोन वर्षानंतर परत मिळाली

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : पुण्यातील भाविकांची दुकानदाराकडे सापडलेली पर्स बुधवारी (ता.24) दोन वर्षानंतर परत दिली. हडपसरच्या काळेपडळ भागातील भाविक संगीता वाघमारे या सुमारे दोन वर्षांपूर्वी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आल्या होत्या. भाविक श्रीमती वाघमारे यांची पर्स गहाळ झाली होती. येथील प्रासादिक वाणाचे दुकानदार मनोज देशमुख यांनी येथील पुजारी दिलीप खपले यांना भेट झाल्यानंतर माझ्याकडे एका अनोळखी महिला भाविकाची पर्स सापडली आहे असे श्री.खपले यांना सांगितले.

श्री. खपले यांनी व्यापारी श्री. देशमुख दुकानात एकत्र बसले असताना पर्सबाबत माहिती दिली. श्री. खपले यांनी पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या गीता फरांदे यांना संपर्क केला. तसेच श्रीमती वाघमारे या प्रसाद खरेदीच्या वेळी त्यांची पर्स तुळजापूर येथे दुकानदार श्री देशमुख यांना सापडली आहे असे सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या फरांदे यांनी पुजारी श्री.खपले यांना वाघमारे यांच्या घराजवळच मी राहते असे सांगितले. वाघमारे यांना पर्स सापडल्याची माहिती फरांदे यांनी दिली. योगायोगाने श्रीमती वाघमारे बुधवारी (ता.२४) तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आल्या होत्या. पर्समध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, 10 हजार रुपये रोख रक्कम होती. श्रीमती वाघमारे यांना व्यापारी श्री.देशमुख यांनी पुजारी श्री. खपले, पुजारी इंद्रजित साळुंके यांच्या समक्ष पर्स सूपूर्द केली.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT