file photo 
मराठवाडा

पूर्णेचा बळिराजा साखर कारखाना साखर उताऱ्यात मराठवाड्यात क्रमांक एकवर

जगदीश जोगदंड

पूर्णा ( जिल्हा परभणी ) : राज्यात १५ मार्चअखेर साडेनऊ कोटी क्विंटल साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असून नऊ कोटी पंचावन्न लक्ष मेट्रीक टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्याचा साखर उतारा १०. ३९ आहे. मराठवाड्यात सर्वाधिक साखर उतारा पूर्णा येथील बळिराजा साखर कारखान्याचा ११. १८ ठरला आहे.

महाराष्ट्रात एकूण ९५ सहकारी तर ९३ खाजगी साखर कारखाने आहे. ४८ साखर कारखाने बंद आहेत. राज्यात या हंगामात नऊ कोटी ५५ लक्ष दोन हजार ४९ मेट्रीक टन ऊसाचे गाळप ता. १५ मार्चअखेर झाले. त्यातून नऊ कोटी ४० लक्ष ४७ हजार ४० क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले. राज्याचा साखर उतारा १०. ३९ आहे. नांदेड विभागात दहा सहकारी व पंधरा खाजगी साखर कारखाने आहेत. एक कारखाना बंद आहे. नांदेड विभागात ८३ लक्ष ३७ हजार २७१ मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले व ८२ लक्ष ७९ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले. त्याचा साखर उतारा ९. ९३ आहे. औरंगाबाद विभागात १२ सहकारी व दहा खाजगी असे २२ साखर कारखाने आहेत. ८० लक्ष ८५ हजार ६४५ मेट्रिक टन साखरेचे गाळप करण्यात आले.७६ लक्ष चार हजार ११५ क्विंटल साखर उत्पादित झाली. त्याचा साखर उतारा ९. ४० आहे.

ऊस लागवड कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे साखर उतारा चांगला

बळीराजा साखर कारखाना लि, कानडखेड ता. पुर्णा जि. परभणी या साखर कारखान्याने १३३ दिवसात पाच लक्ष ४७ हजार ३५० मेट्रिक टन ऊसाचे गाळप करुन सहा लक्ष आठ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादित करण्यात आली. साखर उतारा ११. १८ आला आहे. जो मराठवाड्यात सर्वाधिक आहे. तसेच तीन कोटी २२ लक्ष एक हजार १०० युनिट विज निर्मिती करुन निर्यात केली आहे. अशी माहिती चेअरमन शिवाजी जाधव यांनी दिली. कारखान्यातील सर्व कर्मचारी, शेतकी विभाग, कामगार, ऊसतोड कामगार, वाहतूकदार यांचे हे श्रेय आहे. ऊस लागवड कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे साखर उतारा चांगला आला.
-शिवाजीराव जाधव, चेअरमन बळीराजा साखर कारखाना लि. कानडखेड ता.पूर्णा. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market : सेन्सेक्स 190 अंकांनी घसरून 25 हजारांखाली, निफ्टीही 30 अंकांनी खाली; गुंतवणुकीसाठी पुढचा मार्ग कोणता?

Ladki Bahin Yojana E-KYC : लाडक्या बहिणींनो २ महिन्यांची मुदत, कशी करायची E-KYC? कोणती कागदपत्रं लागणार? जाणून घ्या नेमकी प्रक्रिया...

Sharad Pawar : राज्यात १३५ साखर कारखाने डबघाईला, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Latest Marathi News Updates : निवडणूक आयोगात भाजप कार्यकर्ते, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Ola Uber News : ओला, उबरची भाडेवाढ ! प्रवास १.५ पट होणार महाग, प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

SCROLL FOR NEXT