file photo 
मराठवाडा

साबांच्या लिपिकास झोडपले...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : रस्त्याच्या कामाची माहिती न देणाऱ्या एका लिपीकास तिघांनी संगनमत करून कार्यालयातच मारहाण केली. ही घटना बिलोलीच्या सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तिन जानेवारी रोजी घडली. 

बिलोली तालुक्यातील बडूर ते आदमपूर या रस्त्याचे झालेल्या कामाची माहिती घेण्यासाठी अमोल माधव झुंझारे, भूजंग माधव झुंझारे दोघे रा. साठेनगर, देगलूर आणि किशन रानडे रा. गडगा (ता. नायगाव) हे तिघेजण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. तिन) जानेवारी रोजी गेले. बडूर ते आदमपूर या रस्त्याची माहिती लिपीक माधव पांडूरंग मोरे यांना विचारली. परंतु ही माहिती तोंडी देता येत नाही, त्यासाठी माहिती अधिकारातून माहिती विचारा असे त्यांना श्री. मोरे यांनी सांगितले. मात्र संतप्त झालेल्या या तिघांनी संगनमत करून श्री. मोरे यांना शिविगाळ करत मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांच्या टेबलवरील सर्व फाईलींची फेकाफेक करून कार्यालयात दहशत पसरविली. हा कर्मचाऱ्यांचे वैद्यकिय बिल फाडून नुकसान केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. 

बिलोली पोलिस ठाण्‍यात गुन्हा 

हा प्रकार श्री. मोरे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानाववर घातला. त्यानंतर चक्क आठ दिवसांनी या प्रकरणाची त्यांनी बिलोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. माधव मोरे यांच्या फिर्यादीवरुन बिलोली पोलिस ठाण्यात अमोल झुंझारे, भूजंग झुंझारे आणि किशन रानडे यांच्याविरुध्द शासकिय कामात अडथळा, संगनमताने मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक माधव वाडेकर करीत आहेत. 

शासकिय कर्मचाऱ्यांवर हल्ले चिंतेचा विषय 

शासकिय कार्यालयात कुठली माहिती संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर ती माहिती देण्यास टाळाटाळ करतात. खरे तर झालेल्या कामाची माहिती देणे काही गैर नाही. परंतु आपल्या अधिकाराचा गैरवापर करत काही शासकिय कार्यालयातील मंडळी माहिती देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांच्यावर हल्ले होतात. वाढते हल्ले चिंतेची बाब असून सर्वसामान्यांना विचारलेली माहिती दिली तर हे प्रकार थांबतील असे बोलल्या जाते. 

कायदाचा वचक कमी झाल्याचा फायदा

शासकिय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचे प्रकरण तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात जाणे आवश्‍यक आहे. फक्त सहा महिण्यात या प्रकरणाचा निवाडा होणे अपेक्षीत आहे. परंतु तसे होतांना दिसत नाही. या कलमामध्ये दोन वर्ष सक्त मजुरी व रोख दंडाची शिक्षा देण्यात आलेली आहे. हल्लेखोरांना जर तात्काळ शिक्षा झाली तर यावर आळा बसु शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT