file photo
file photo 
मराठवाडा

मराठवाड्यातील ‘या’ तीन जिल्ह्यात आज पावसाची शक्यता

कैलास चव्हाण

परभणी : मराठवाडयात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणात देखील उष्णतेची लाट आली आहे. परभणीत शुक्रवारी ४२.८ अंश तापमान नोंदवले गेले आहे. दरम्यान शनिवारी (ता.दोन मे) नांदेड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांत  हलक्या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता असल्याची माहीती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिली आहे.

मागील चार दिवसांपासून मराठवाड्यात  उष्णतेची लाट सुरु झाली आहे. या आधी संपूर्ण हिवाळ्यात ढगाळ वातावरण आणि सातत्याने पावसाची हजेरी लागली होती. त्यानंतर उन्हाळा सुरु झाल्यानंतरही ढगाळ वातावरण राहील्याने उन्हाची तिव्रता जाणवली नाही. दोन अठवड्यापुर्वी सलग तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली.

तसेच मागील अठवड्यात देखील मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाला. आता चार दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असताना पुन्हा शुक्रवारी (ता.एक मे) ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पुढील काही दिवस वातावरण अंशत: ढगाळ राहुन दोन मे रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

पिकांची अशी घ्या काळजी 
ऊस पिकावरील पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्‍यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी क्‍लोरपायरीफॉस २० टक्के ३०  मिली किंवा फिप्रोनील पाच टक्के ३० मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आंबे बहार धरलेल्‍या संत्रा व मोसंबी फळबागेत पोटॅशियम नायट्रेट १५ ग्रॅम टक्के  चिलेटेड झिंक पाच ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्‍या व लहान कलमांना सावली करावी. तसेच बागेत जैवीक आच्‍छादनाचा वापर करावा. बागेस सकाळी, संध्‍याकाळी किंवा रात्री पाणी द्यावे, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम सेवा विभागाने दिला आहे.

परभणी तापली
मागील काही दिवसापासून परभणीत उष्णतेची लाट पसरली आहे. गुरुवारी तापमान ४७.५ अंशावर गेले होते. शुक्रवारी ऊन सावलीचा खेळ सुरू होता. दिवसभर कधी लख्ख प्रकाश तर कधी ढगाळ वातावरण राहत होते. दुपारी ४२.५ अंश तापमान नोंदवले गेले. सांयकाळी परभणी शहरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री उशिरापर्यंत ढग दाटून आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT