पिंपळगांव रेणूकाई : देहेड परिसरात पावसामुळे शेतात साचलेले पाणी. 
मराठवाडा

एकीकडे ढग, वारा, दुसरीकडे आषाढधारा

प्रकाश ढमाले

पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) - एकीकडे ढग, वारा, दुसरीकडे आषाढधारा अशी गत परिसरात दिसून आली. देहेड भागातच तीन दिवसांनंतर पुन्हा शुक्रवारी (ता. २६) पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पिंपळगाव रेणुकाई भागातील शेतकऱ्यांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. पावसाला सुरवात होणार असल्याची आशा मग निराशेत बदलली आहे. 

जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील वरूड बुद्रुक, रेलगाव, देहेड, मुर्तड आदी भागांमध्ये तीन दिवसांपूर्वी मंगळवारी जोरदार पाऊस झाला होता. यावेळी उत्तर भाग पावसाने सोडून दिला होता. तीच पुनरावृत्ती पुन्हा शुक्रवारी पावसाने दाखवल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. भोकरदन तालुक्‍याच्या उत्तर भागात आजही केवळ वारा, ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट दिसून आला.

सध्या पावसाची नितांत आवश्‍यकता असतानाही पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांवरील संकट वाढत आहे. आधीच कडाक्‍याचे ऊन, पावसाचा पत्ता नाही अशात पिंपळगाव रेणुकाईसह शेलूद, लेहा, पारध, पद्मावती, धावडा, हिसोडा आदी भागांमध्ये सोयाबीन वगळता इतर पिकांची चांगली उगवण झालेली पिके सुकत चालली आहे. तर शुक्रवारी काही भागांत झालेल्या अल्प पावसाने पिकांचा धोका अधिक वाढला आहे.

दरम्यान, वरूड बुद्रुक, रेलगाव, देहेड, मुर्तड परिसरात झालेल्या जोरदार पावसाने शेतात पाणी साचले आहे, तर वादळामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेली उन्हाळी मिरची पीक आडवे झाले आहे. या परिसरात सायंकाळी पाच वाजेपासून रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरींवर सरी कोसळत राहिल्या होत्या. 

वरूड बुद्रुक परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाबरोबर वाराही सोसाट्याने वाहत होता. या पाऊस व वाऱ्याचा मिरचीच्या पिकाला फटका बसला आहे, शेतातील मिरची पीक जमिनीवर टेकले आहे. 
- योगेश वाघ, शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT