पावसाने पाझर तलावांचेही बेहाल sakal
मराठवाडा

पावसाने पाझर तलावांचेही बेहाल

देखभाल व दुरुस्ती न झाल्याने फुटलेल्या तलावांचे पाणी शेतशिवारातही शिरले

कृष्णा भावसार

मंठा : तालुक्यात नुकत्याच झालेल्या जोरदार पावसाने ठिकठिकाणच्या पाझर तलावांचेही बेहाल झाले आहेत. वेळीच देखभाल व दुरुस्ती न झाल्याने फुटलेल्या तलावांचे पाणी शेतशिवारातही शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांनाही फटका बसला.

तालुक्यातील उत्तरेकडील भाग डोंगराळ असून या भागातील बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तसेच कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने हंगामी पिके घेतल्यानंतर बहुतेक शेतकरी कुटुंब दिवाळीनंतर साखर कारखाना किंवा मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरात कामधंद्याच्या शोधात दरवर्षी स्थलांतर करतात.

शेती सुधारावी, शेतीचे उत्पादन वाढावे म्हणून शासन विविध उपाययोजना राबवीत आहे. तालुक्यात मागील पंचवीस- तीस वर्षाच्या काळात लघुपाटबंधारे विभागाकडून ठिकाणी पाझर तलाव बांधण्यात आले आहे. पाणी साठा उपलब्ध झाल्याने रब्बीच्या पिकाकरिता पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. परंतु काही ठिकाणी तलावाचे अपूर्ण काम तर काही ठिकाणी तलावाच्या भिंतीस भेगा पडल्याने, भिंतीवर मोठमोठी झाडे, झुडपे वाढल्याने तलावातील पाण्याची गळती होऊन पाऊस भरपूर असून देखील तलाव कोरडे पडत आहे.

यावर्षी तालुक्यातील पांगरा गडदे व ढोकसाळ येथील तलाव फुटून शेतकऱ्यांची पिकासह शेती खरडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पाणीही वाहून गेले, परिणामी आता रब्बीच्या हंगामात पिकाला पाणी मिळणार नाही. लघू पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. तालुक्यात लघू पाटबंधारे विभागासह इतर यंत्रणेमार्फत बांधण्यात आलेल्या तलावाची पावसाळ्यापूर्वी पाहणी करणे आवश्‍यक होते. तलावाच्या भिंती पडलेल्या भेगा, भिंतीवर वाढलेले मोठे झाडेझुडपे काढून वेळीच दुरुस्ती केली असती तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते. या पुढील काळात तालुक्यातील पाझर तलावांच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT