परभणीत जोरदार पाऊस झाला आहे. Marathwada Rain Forecast
मराठवाडा

मराठवाड्यात तीन ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता

गणेश पांडे

परभणी : मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यात १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (Vasantrao Naik Marathwada Agriculture University) ग्रामीण कृषी मौसम विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. परभणी जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे गोदावरीसह जिल्ह्यातील सर्व छोट्या - मोठ्या नद्या तुटूंब भरून वाहत आहेत. गेल्या आठवड्यापासून हवामान (Rain Forecast In Marathwada) केंद्राकडून वर्तविण्यात येणारा अंदाज तंतोतंत खरा ठरत आहे. सोमवारी (ता.२७) व मंगळवारी (ता.२८) या दोन दिवसात संपूर्ण मराठवाड्यात संततधार सुरु होती. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अनेक फळबागामध्ये पाणी शिरल्याने फळबागांचे नुकसान झाले आहे. कापुस, सोयाबीनच्या शेतात अजूनही पाणी साचलेले असल्याने सोयाबीन वाहून गेले आहे.

काही ठिकाणी पाण्यामुळे सोयाबीनच्या शेंगा झाडालाच नासल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बुधवारी (ता.२९) सकाळपासून परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी आता परत ता. एक ऑक्टोबरपासून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्यावतीने प्राप्त झालेल्या अंदाजानुसार एक ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात तर दोन ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना बीड व परभणी जिल्ह्यात तसेच तीन ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम विभागा मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ.के.के. डाखोरे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT