परतूर : राजेश नहारच्या कारच्या काचेवरील गोळीबाराच्या खुणा. 
मराठवाडा

राजेश नहारचा गोळ्या झाडून खून 

योगेश बरिदे

परतूर (जि.जालना) -  हत्येसाठी सुपारी देणारा परतूरचा व्यापारी राजेश नहार याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. यात कारमधून जाणाऱ्या नहारच्या दिशेला दोन गोळ्या झाडण्यात आल्या. यातील दुसरी गोळी त्याच्या कानाखाली लागली, त्यातच तो गतप्राण झाला. शिंगाडेपोखरी फाटा (जि. जालना) येथे ही घटना शनिवारी (ता. 11) रात्री अकरा वाजता उघडकीस आली. 

परतूर येथील व्यापारी राजेश नहार आधीच वादात सापडलेला होता. त्याने बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत आणि व्यापारी विमलराज सिंघवी यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले होते; तसेच या दोन्ही प्रकरणांत राजेश नहार याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. या दोन्ही प्रकरणांचा सध्या तपास सुरू आहे. यादरम्यान शनिवारी (ता. 11) रात्री वाटूर-जालना महामार्गावरील परतूर तालुक्‍यातील शिंगाडेपोखरी फाटा येथे राजेश नहार याच्यावर कोणीतरी दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्याच्या कानाखाली लागली. त्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी दाखल केले; मात्र त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परतूरचे पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यासोबतच अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सोपान बांगर, स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्रसिंह गौर यांच्यासह परतूरचे सर्व अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

दुचाकीस्वाराने गोळ्या झाडल्याचा अंदाज 
राजेश नहार हा कारने जात होता. तेव्हा त्यास दुचाकीस्वाराने थांबविले असावे. त्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला थांबविल्यावर मारेकऱ्याने दोन गोळ्यांच्या फैरी झाडल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना झाडलेल्या गोळीचे अवशेषही सापडले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31,000 खाली; ऑक्टोबरमध्येही घसरण कायम, ताजा भाव किती?

Tiger Death: जंगलातून शेतापर्यंत वाघांचा पाठलाग; झुंजीत नर वाघाचा मृत्यू झाल्याचा वनविभागाचा अंदाज

Ramdas Athawale: बारा वर्षांनंतरही सत्तेत योग्य वाटा नाही; रिपाइं आठवले गटाला संधीची प्रतीक्षा, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

Latest Marathi News Live Update : एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार? अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

SCROLL FOR NEXT