Raju Shetty criticises political parties for their stand on Farmers issues
Raju Shetty criticises political parties for their stand on Farmers issues  
मराठवाडा

शेतकऱ्यांना फसविण्याबाबत सर्वच पक्षांचे एकमत : राजू शेट्टी

सकाळवृत्तसेवा

नांदेड : शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव देतांना यंदा सरकारने दोनशे रुपयांची वाढ केली. परंतु ही दरवाढ नसून, शासनाने नियमाच्या चौकटीत राहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील साखर सम्राटांना वाचविण्यासाठीच शेतकऱ्यांना फसवण्यासाठी सरकार आणि राजकीय लबाड पक्षाने एकमत केले असल्याचे आरोप खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत बोलताना केला.

प्रा. डॉ. प्रकाश पौपळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.२६) पावडे मंगल कार्यालयात शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, सरकराने शेतकऱ्यांना एका टना मागे १५८ रुपयांचा घाटा केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळवून देण्यासाठी न्यायलयीन लढाई सुरु असून, त्यांना त्यांच्या हक्कचे पैसे मिळवून दिल्याशिवाय शेतकरी संघटना पक्ष शांत बसणार नाही. 

भाषण केल्याने कुठलीही क्रांती होत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना एकसंघपणे लढण्याची गरज आहे. सरकारने कर्ज माफी देताना सरसकट, तत्वता आणि निकष हे तीन शब्द टाकून शेतकऱ्यांचा घात केला. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. परंतु आता आम्हाला कुणाच्या दया, मेहरबानी आणि भिकेची गरज नाही. संविधानाने दिलेल्या कायद्याप्रमाणे आम्हाला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहेत. त्यासाठी ३० नोव्हेंबरला संसदेला घेराव घालून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वेगळे अधिवेधन घेण्याची मागणी करण्यात येईल, तेव्हा कळेल कोणता पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने आणि कोण विरोधात आहे ते! 

आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेची किंमत बघता शेतकऱ्यांच्या साखरेलासुद्धा चांगला दर मिळणे अपेक्षित आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांच्या ऊसाला हमी भाव देत नाही. त्यामुळे यंदा ऊसाची लागवड घटली असून, भविष्यात भारताला दुसऱ्या देशातून साखर आयात करावी लागेल. शेतकऱ्यांना १५८ रुपये मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरु अाहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून दिल्याशिवाय शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले.

या वेळी माजी मंत्री सुबोध मोहिते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माणिकराव राजेगोरे, प्रल्हाद इंगोले यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT