Ramdas Athawale News esakal
मराठवाडा

देशात २०२४ मध्ये पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार, आठवलेंची भविष्यवाणी

'देशात सर्व विरोधक, ममता बॅनर्जीसह एकत्र आले, तरी ते मोदींशी सामना करणे अशक्य'

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (जि.बीड) : देशात केलेल्या विविध विकास कामांच्या पाठबळावर देशात २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार असेल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी बुधवारी (ता.आठ) येथे केले. राज्यसभेच्या जागाही आम्ही जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेतील प्राचार्य डाॅ. कमलाकर कांबळे यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्कार सोहळ्यास आठवले आले होते. त्यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या राज्यसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. आघाडी सरकारने कितीही प्रयत्न केले, तरी आमचे धनंजय महाडिक हेच निवडून येतील. शिवसेनेने येथे उमेदवार उभा केल्याने भाजपला (BJP) उमेदवार द्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले. (Ramdas Athawale Says, Under Narendra Modi Leadership Government Make In 2024)

मोदींचा सामना करणे अशक्य

मागील आठ वर्षात नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखालील सरकारने देशात राष्ट्रीय रस्त्यांची मोठी कामे करून विकास घडवून आणला. काँग्रेसची इतके वर्षे सत्ता होती. परंतू ते असा विकास घडवू शकले नाहीत. मोदी सरकारच्या विविध योजनेत झालेल्या कामाची माहिती देऊन, देशाने प्रगती साध्य केली आहे. याच बळावर पुढच्या (२०२४) पंचवार्षिक योजनेतही मोदींचेच नेतृत्व असेल. रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचेही त्यांनी सांगितले. या आठ वर्षात कुठलाही घोटाळा किंवा भ्रष्टाचाराचा एकही प्रकार पुढे आला नाही. देशात सर्व विरोधक, ममता बॅनर्जीसह एकत्र आले, तरी ते मोदींशी सामना करणे अशक्य असल्याचेही आठवले म्हणाले. (Beed News)

स्थानिक निवडणुका लढविणार

आरपीआयला राज्यसभेची एखादी जागा मिळायला पाहिजे होती. अशी खंत व्यक्त करीत, येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत आमची भाजपशी युती असेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी तशी चर्चा झाली असून आरपीआय युतीत प्रत्येक ठिकाणी पाच जागा घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत आम्ही एकत्र येऊन शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचू असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. राज्यसभा निवडणुकीत होणाऱ्या घोडेबाजारावर बोलताना, ते म्हणाले आम्हाला घोडेबाजार करण्याची गरज नाही, फोडाफोडी करायची नाही, आमची जागा निवडून येत असल्याचा दावाही त्यांनी केला.

महाविकास आघाडी सरकार अपयशी

ओबीसी आरक्षण जाणे हे या महाविकास आघाडीला सरकारचे अपयश आहे. याबाबत सरकारने व त्यांच्या वकिलांनी योग्य बाजू मांडली पाहिजे. त्यात त्यांना यश यावे अशा सदिच्छाही आठवले यांनी व्यक्त केल्या. यावेळी युवा रिपाईचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह रिपाइचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Noida Owl Terror: कुत्रे-माकडांनंतर आता घुबडांची दहशत; थेट डोक्यावर झडप, शहरातील नागरिकांमध्ये पसरली आहे भीती

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT