Raosaheb Danve esakal
मराठवाडा

जालना-खामगाव रेल्वेसाठी साडेतीन कोटींचा निधी : रावसाहेब दानवे

जालना-खामगाव रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी ब्रिटिश काळापासून मागणी होत होती.

उमेश वाघमारे

जालना : ब्रिटिश काळापासून मागणी होत आलेल्या जालना-खामगाव रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी साडेतीन कोटी रुपये दिल्याची महिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. जालना येथून रविवारी (ता.दोन) जालना-जोरहाट किसान रेल्वे व नांदेड-जालना-हडपसर या दोन नवीन रेल्वेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार कैसाल गोरंट्याल, नारायण कुचे, विक्रम काळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे आदींची उपस्थिती होती. या वेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, की जालना-खामगाव (Jalna) हा रेल्वेमार्ग व्हावा अशी मागणी ब्रिटिश (British) काळापासून होत आहे. या रेल्वेमार्गाचे तीन वेळा सर्वेक्षण करण्यात आले. हा रेल्वेमार्ग रेल्वेसाठी उत्पन्नाचा नाही असे अहवाल आले होते. (Raosaheb Danve Said, Three And Half Crores Fund For Jalna Khamgaon Railway Survey)

मात्र, या रेल्वेमार्गाचे पुन्हा एकदा अंतिम सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या सर्वेक्षणासाठी साडेतीन कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे, असे दानवे यांनी सांगितले. शिवाय जालना येथे जालना-जोरहाट किसान रेल्वे सुरू करण्यात आली असून जालना येथील शेतमाल इतर राज्यात घेऊन जाण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे या रेल्वेने शेतमालाच्या भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच मराठवाड्यातून रोज चारशे ते साडेचारशे ट्रॅव्हल्स पुणे येथे जातात. त्यामुळे पुण्यासाठी रेल्वे सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियोजन केले आणि आज नांदेड-जालना-हडपसर रेल्वे सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी यावेळी सांगितले.

तसेच मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून या रेल्वेसाठी किती खर्च लागेल. या मार्गावर कुठे स्थानक करावे, किती जागा लागेल याचा अंदाज घेणे सुरू असून 38 टक्के जागा घ्यावी लागणार आहे. उर्वरित जगा ही राज्य सरकारकडे असून राज्य शासनाशी या संदर्भात चर्चा केली जाणार आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT