toilets
toilets 
मराठवाडा

स्‍वच्‍छतागृह दारात नसल्यास रेशन, केरोसिन नाही

मंगेश शेवाळकर

हिंगोली - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २०१६-१७ मधील वार्षिक कृती आराखड्यामध्ये सर्व गावे पाणंदमुक्‍ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, २ ऑक्टोबरपर्यंत जिल्हा पाणंदमुक्त करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. त्‍यानुसार सोमवारपासून (ता.१५) वैयक्तीक स्‍वच्‍छतागृह नसणाऱ्या जिल्ह्यातील कुंटुबांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे रेशन आणि केरोसीन बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

स्वच्छ भारत मिशन या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी  करण्यासाठी  जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करुन देखील नागरिक स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे प्रशासनाच्या निर्दशनास येत आहे. स्वच्छ भारत मिशन या अभियानास गती देण्यासाठी प्रशासनाने यापुढे कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना आळा घालण्यासाठी  प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गुडमॉर्निंग पथकात पोलिस प्रशासनाच्या मदतीने संबधितावर कलम ११५ व ११७अन्वये कार्यवाही करण्यात येणार. सदर कलमान्वये बाराशे रुपयापर्यंतची दंडात्मक कार्यवाही देखील केली जाणार आहे.

स्वच्छ भारत मिशन अभियानाचे गांभीर्य नागरिकांना कळावे यासाठी ता. १५ मेपर्यंत वैयक्तीक स्‍वच्‍छतागृह न बांधणाऱ्या कुंटुबांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यात प्रामुख्याने स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना प्राप्त होणारे रेशन व केरोसिन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे ज्या कुंटुंबाना राशन अथवा केरोसिन हवे असेल त्यांना यापुढे आपले वैयक्तीक शौचालय असल्याचे संबंधीत ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र स्वस्त धान्य दुकानदाराकडे सादर करणे बंधककारक असणार आहे. वैयक्तीक स्‍वच्‍छतागृह असल्याबाबतचे प्रमाणपत्र नसल्यास संबधितास वरीलप्रमाणे लाभ दिला जाणार नाही. 

तसेच ग्रामपातळीवरील सर्व तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्याकडून दिले जाणारे विविध दाखले देखील न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.  तरी जिल्ह्यातील ज्या कुटुंबानी अद्यापपर्यंत आपले वैयक्तीक स्‍वच्‍छतागृह बांधले नसल्यास त्यांनी तात्काळ म्हणजे ता. १५ मे पूर्वी स्‍वच्‍छतागृह बांधून स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गंत जिल्हा पाणंमुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT