Ravikant Tupkar esakal
मराठवाडा

Buldhana : ..तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन विसाव्या मजल्यावरून उड्या मारू; रविकांत तुपकरांचा थेट इशारा

प्रशासनात एकच खळबळ उडाली असून पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शहर पोलिसांनी (Mumbai Police) तुपकरांच्या निवासस्थानी जाऊन नोटीस बजावली. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन मागे घेणार नसल्याची प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली आहे.

बुलडाणा : पीकविमा, अतिवृष्टीची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी या मागणीसाठी १६ जूनला विमा कंपनीच्या विसाव्या माळ्यावरून शेतकऱ्यांसह उड्या मारण्याचा इशारा रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे.

यानंतर यंत्रणा खडबडून जागे झाली असून तुपकर व शेतकऱ्यांना आंदोलन न करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. तुपकरांनी पत्रकार परिषद घेत मुंबई येथील पीकविमा कंपनीचे कार्यालय असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इमारतीच्या विसाव्या मजल्यावरून शेतकऱ्यांसह उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

त्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली असून पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहर पोलिसांनी (Mumbai Police) तुपकरांच्या निवासस्थानी जाऊन नोटीस बजावली. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन मागे घेणार नसल्याची प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली आहे.

सोयाबीन, कापसाला दरवाढ, पीकविमा, अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, पीककर्जाचे वाटप पेरणीपूर्वी करावे, पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत द्यावी, यासह शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी लढा दिला जात आहे. परंतु सरकार दुट्टपी धोरण राबवीत आहे, असा आरोप त्यांनी केला.

15 जूनपर्यंत मागण्या पूर्ण

न केल्यास 16 जूनला हजारो शेतकऱ्यांसह (Farmers) मुंबईत एलआयसी या विमा कंपनीच्या मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मार्केटमधील विसाव्या मजल्यावरील कार्यालयातून उड्या मारू, असा इशारा तुपकर यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर प्रशासन सावध झाले आहे. बुलढाणा पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून आंदोलन करण्यास मज्जाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT