file photo
file photo 
मराठवाडा

 ‘आरईटी’ अंतर्गत  १२४ शाळांची नोंदणी

कैलास चव्हाण

परभणी : शिक्षण अधिकार अधिनियम २००९ नुसार खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळेमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांमुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १२४ शाळांनी नोंदणी केली असून त्यामध्ये एक हजार १४८ जागा उपलब्ध झाल्या आहेत. सोमवारी (ता. दहा) नोंदणीचा अखेरचा दिवस असून यात शाळांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यानंतर एकूण राखीव जागा व शाळांची संख्य स्पष्ट होणार आहे.

यंदाची ‘आरईटी’ प्रक्रिया ता. २१ जानेवारीपासून सुरू झाली आहे. वेळापत्रकानुसार पहिल्यांदा ता. सहा फेब्रुवारीपर्यंत ‘आरटीई’ प्रवेशप्राप्त २०२०-२१ मधील शाळांची नोंदणीची गटशिक्षणाधिकारी स्तरावरून करण्याची मुदत होती. त्यामध्ये सुरवातीला दोन दिवसांची आणि पुन्हा दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संकेतस्थळावर दिलेल्या वेळापत्रकानुसार आता दहा फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तसेच ११ ते २९ फेब्रुवारी दरम्यान, पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कालावधी दिला आहे. तर ११ ते १२ मार्च दरम्यान, राज्यस्तरावर लॉटरी काढण्यात येणार आहे. लॉटरी काढल्यानंतर १६ ते तीन मार्च दरम्यान प्रवेश मिळालेल्या पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्‍चित करून घेणे गरजेचे आहे. १३ ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. २४ ते २९ एप्रिल दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी कालावधी दिला आहे. सहा ते १२ मे दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार आहे.


हेही वाचा - दरोडाप्रकरणातील टोळी पोलिसांच्या ताब्यात

रिक्‍त जागांची प्रतीक्षा यादी
तर १८ ते २२ मे दरम्यान, चौथ्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत. या वर्षीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही राज्य स्तरावरून राबविण्यात येणार असून शाळेतील रिक्‍त जागेच्या संख्येनुसारच रिक्‍त जागांची प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. हे या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर कागदपत्र पडताळणीसाठी समिती स्थापन करायची आहे. त्यामुळे, या वर्षीची प्रवेश प्रक्रिया लवकर आणि अपेक्षित वेळेत पार पडण्यासाठी मदत होणार आहे.


परभणीत १२४ शाळांची नोंदणी
परभणी जिल्ह्यात ‘आरटीई’ अंतर्गत १२४ शाळांनी शुक्रवारपर्यंत नोंदणी केली आहे. उर्वरित शाळांची नोंदणी सोमवारपर्यंत होणार आहे. गतवर्षी १६५ शाळांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये एक हजार ४०७ जागा उपलब्ध झाल्या होत्या.

कागदपत्र ‘ऑनलाइन’ भरावी लागणार
‘आरटीई’मधून प्रवेशासाठी पालकांना प्रवेशासाठी आवश्‍यक ते सर्व कागदपत्र ऑनलाइन भरावी लागणार आहेत. ‘आरटीई’ प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांची माहिती गटशिक्षणाधिकारी दालनाबाहेरील सूचना फलकावर लावण्यात येणार आहे.


हेही वाचा -​ सेलूतून साईबाबा जन्मभूमीकडे हाजारो भाविक मार्गस्थ

तालुका शाळांची संख्या
गंगाखेड २८, जिंतूर १४, मानवत ०६, पालम ०५, परभणी शहर १५, परभणी ग्रामीण २४, पाथरी ०४, पूर्णा १३, सेलू ०३,
सोनपेठ १२, एकूण १२४.

प्रक्रिया पारदर्शकपणे
शाळांची नोंदणी झाल्यानंतर उपलब्ध जागेनुसार प्रवेश प्रक्रिया होणार आहे. पालकांनी वेळेत आणि विहीत नमुन्यात परिपूर्ण अर्ज भरावेत. यंदा शाळेतील मुलांचा आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आलेल्या प्रवेशाबाबत कोणतीही चुकीची माहिती देता येणार नाही. त्यामुळे प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार आहे.
-डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT