मराठवाडा

हिंगोलीत ३७ हजार कामगारांची नोंदणी

राजेश दारव्हेकर

हिंगोली: येथील जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात डिसेंबरअखेर ३७ हजार बांधकाम कामगारांनी नोंदणी केली आहे. गुरुवारी (ता. २३) येथे पाचशे कामगारांनी विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी नाव नोंदणी केली आहे. त्यामुळे कार्यालयाच्या बाहेर कामगारांची रांगा लागल्या होत्या.

राज्य शासनाच्या पंधरा ते सोळा योजना आहेत. या योजनेचा लाभ नोंदणी केलेल्या कामगारांना सरकारी कामगार कार्यालयामार्फत दिला जातो. त्यासाठी मागील महिन्यापासून कामगारांची नोंदणी करण्यासाठी गर्दी होत आहे. गुरुवारी ( ता. २३) पाचशे कामगारांनी विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी कार्यालयाकडे अर्ज केल्याचे सहायक कामगार अधिकारी नामदेव भिसे यांनी सांगितले.

कामगारांनी केली गर्दी
 
दरम्‍यान, या कार्यालयाची इमारत अपुरी पडत आहे. नोंदणी करण्यासाठी जिल्हाभरातील कामगारांनी गर्दी केली होती. त्यामुळे कार्यालयाच्या बाहेरही कामगारांची रांग लागली होती. यामुळे परिसरातील वसाहतीत जाणाऱ्य नागरिकांना मार्ग काढण्यासाठी जिकरीचे बनले होते. या वेळी योजनेची माहिती कामगारांना पाहता यावी यासाठी कार्यालयाच्या भिंतीवर माहिती डकविण्यात आली आहे. दरम्यान, या कार्यालयातील जिल्हा कामगार अधिकारी श्री. कराड यांच्याकडे तीन जिल्ह्यांचा पदभार आहे.

कामगारांचे आर्थिक नुकसान

 त्यामुळे ते हिंगोली येथे क्वचित भेट देतात. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिले नसल्याने मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. याचा फटका नावनोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यास बसत असून एकाच कर्मचाऱ्यावर नावनोंदणीचा ताण पडत आहे. तसेच कामगारांनाही दिवसभर थांबावे लागत आहे. मजुरी बुडवून नावनोंदणीसाठी आलेल्या कामगारांचे यामुळे नुकसान होत आहे.

जनजागृतीची गरज


जिल्हाभरात ३७ हजार कामगारांनी नोंदणी केली आहे. कामगारांनी नोंदणी केली असली तरी या कामगारांना शासनाच्या योजनांची माहिती मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. शासनाच्या योजनांची माहिती नसल्याने कामगारांना वंचित राहावे लागत आहे. शासनाच्या विविध योजनांच्या जनजागृतीची गरज असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

कार्यालयात मिळेना माहिती

येथील कामगार अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा वचक राहिला नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या कामगारांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळण्यास अडचणी येत आहेत. विविध कागदपत्रे आणूनही केवळ योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने नोंदणीसाठी अनेक दिवस कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. 

कामाच्या शोधार्थ मजुरांचे स्थलांतर

जिल्ह्यातील मजुरांना जिल्ह्यातच कामे उपलब्ध करून दिली जातात. मात्र, सध्या पुरेशी कामे उपलब्ध नसल्याने अनेक मजुरांनी कामाच्या शोधार्थ स्थलांतर केले आहे. त्यामुळे वाडी-तांड्यावरील काही वस्त्या ओस पडल्याचे पहावयास मिळत आहे. या मजुरांना गावातच कामे उपलब्ध करून दिल्यास मजुरांची भटकंत थांबण्यास मतद होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT