मानवत : मानवत रोड बायपास येथील अंतिम टप्प्यात असणारे उड्डाणपुलाचे काम. 
मराठवाडा

रेल्वे फाटकाच्या अडथळ्यातून होणार सुटका

किशन बारहाते

मानवत ः राष्ट्रीय महामार्गावरील मानवत रोड येथील बायपास उड्डाणपुलाचे वर्षभरापासून रखडले काम सध्या अंतिम टप्प्यात असून महिनाभरात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे प्रवाशांचा रेल्वे फाटकाचा मनस्ताप टळणार आहे. शिवाय जिल्हा ठिकाणाचे अंतर अडीच किलोमीटरने कमी होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांच्या माजलगाव उपविभागांतर्गत मानवत रोडपर्यंतच्या मार्गाचा समावेश होतो. एका बहुराष्ट्रीय कंपनीने दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ चे काम केले आहे. या महामार्गावर मानवत-परभणी दरम्यान, मानवत रोड येथे अंतर कमी करण्यासाठी बायपास मार्ग तयार केला जात आहे. 

परभणीचे अंतर अडीच किमीने कमी होणार
या बायपासमुळे परभणीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मानवत रोडवरून प्रवास करण्याची आवश्यकता राहणार नाही. परभणीचे अंतर अडीच किमीने कमी होणार आहे. शिवाय जुन्या मार्गावरील नांदेड -मनमाड या लोहमार्गावर उड्डाणपूल नसल्याने दिवसभरात ४० ते ५० वेळा रेल्वे वाहतुकीसाठी फाटक बंद केले जाते. या वेळी रस्ताच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत असत. यामुळे वाहनांचालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. विशेषतः पाथरी व मानवत येथे आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने अत्यवस्थ अवस्थेत रुग्णास परभणीला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकादेखील फाटकावर अडकून पडत असत. नवीन बायपासवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत तयार करण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना वर्षभरापासून रखडले होते.

नोव्हेंबर महिन्यात कामाला सुरवात 
नांदेड-मनमाड या लोहमार्गाचे दुहेरीकरण कामास मंजुरी मिळाल्याने उड्डाणपुलाच्या उंचीचा प्रश्न न सुटल्याने काम अनेक दिवसांपासून रेंगाळले होते. यानंतर नोव्हेंबर महिन्यात कामाला सुरवात झाली होती. मागील दोन महिन्यांत अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे युद्धपातळी काम करण्यात आले असून साधारणपणे येत्या महिनाभरात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. रेल्वे फाटकमुळे होणारा प्रवाशांचा मनस्ताप आता दूर होणार आहे.

महामार्गाचे काम रखडले...
मानवत रोडपर्यंत राष्ट्रीय महामार्गांचे काम पूर्ण झाले असले तरी कोल्हापाटी ते परभणी या मार्गाची चाळणी झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून दुचाकी वाहन चालविणेदेखील अवघड झाले आहे. हा मार्ग तीन तालुक्यांना जिल्हा ठिकाणाशी जोडणारा असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मागील दोन वर्षांपासून या मार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी खोदकाम करण्यात आले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे चित्र आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT