file photo 
मराठवाडा

घरपोच भाजीपाला विक्रीला प्रतिसाद

कैलास चव्हाण

परभणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील भाजीपाला मार्केटमधील गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गटाने शहरीभागात थेट घरपोच भाजीपाला विक्री भर दिला आहे. सोशल मीडियावरदेखील बाजारपेठ सक्रिय झाली आहे. दरम्यान, पाथरी रस्त्यावरील ठोक भाजीपाला मार्केट सुरू राहणार आहे. 
परभणी शहरातील पाथरी रस्त्यावर भाजीपाला खरेदी-विक्रीचे ठोक मार्केट आहे. यामार्केटमध्ये देशभरातून भाजीपाला व फळे येत असतात. त्यामुळे किरकोळ विक्रेत, ठोक विक्रेते, खरेदीदार यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांची तुफान गर्दी होत असते. अनेकदा सांगुनही सुरक्षित अंतराबाबत सूचना पाळत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने हे मार्केट बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, पुन्हा नियम पाळत मार्केट सुरू ठेवण्यास सांगितले. त्यानुसार रविवारी मार्केट सुरू राहिले. तर काही शेतकरी कंपन्या व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी घरपोच भाजीपाला विक्री सुरू केली आहे. शहरातील नागरिकांना भाजीपाला कमी पडू नये म्हणून आणि स्थानिक भाजीपाला उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी थेट घरपोच भाजीपाला विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार अनेक शेतकरी गटाच्या माध्यमातून भाजीपाला विक्री करत आहेत. 

शेतकरी ते थेट ग्राहक उपक्रमास सुरवात
वर्णा (ता. जिंतूर) येथील वर्णेश्वर ॲग्रो प्रोड्युसर कंपनीतर्फे सभासद शेतकऱ्यांच्या भाजीपाला विक्रीसाठी  शनिवारी (ता. चार) शेतकरी ते थेट ग्राहक या उपक्रमास शहरातील शिवाजीनगर येथे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या उपस्थित  सुरवात झाली आहे. या वेळी जिल्हा पणन व्यवस्थापक पंकज चाटे, कंपनीचे अध्यक्ष दिलीप अंभुरे उपस्थित होते.

सोशल मीडिया बनली बाजारपेठ...
 सोशल मीडियाचा वापर कोरोनाच्या अशा संकटकाळात होत आहे. शहर आणि परिसरातील खेडेगावांतील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर ग्रुप तयार करत भाजीपाला विक्री सुरू केली आहे. परभणी शहरातील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, अन्य नागरिक यांचा ग्रुपमध्ये समावेश करत त्यांच्या मागणीनुसार भाजीपाला घरपोच बाजारभावाप्रमाणे दिला जात आहे. त्यामध्ये धान्य, फळांचाही समावेश आहे. त्यासाठी सकाळी सात ते आकरा ही वेळ ठरविण्यात आली आहे.

भाजीपाला खरेदी-विक्री सुरू ठेवणार
भाजीपाला अत्यावश्यक असल्याने ठोक मार्केट सुरू राहणार आहे. एकाच ठिकाणी नियम पाळत भाजीपाला खरेदी-विक्री सुरू ठेवणार राहणार.
सय्यद मुसा, सचिव भाजीपाला मार्केट असोसिएशन.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhavwadi Theft case : धक्कादायक! वैभववाडीत बंद बंगला फोडला, चक्क चोरट्यांनी दोन गॅस सिलिंडर चोरले

MI vs KKR सामन्यावर पावसाचं सावट? काय आहेत हवामान अंदाज अन् कसा राहिलाय दोन्ही संघाचा रेकॉर्ड?

Mobile Storage Tricks : सतत मोबाईलचं स्टोरेज फुल्ल होतंय? फ्रीमध्ये मिळेल जास्त स्पेस, एकदा वापरुन तर बघा 'ही' १ सोपी ट्रिक

Latest Marathi News Live Update : खरातशी निकट संबंध असलेल्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी – अनिल देशमुख

Horoscope : उद्या ३० मार्च! नवा आठवडा 'या' ३ राशीच्या लोकांसाठी धनलाभ योग आणणार; अडकलेले मोठे काम मार्गी लागणार, विदेश दौरा संभवतो

SCROLL FOR NEXT