File Photo 
मराठवाडा

लॉकडाऊनचा परिणाम : नांदेड विभागातील ‘एसटी’चे तीन हजार कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत

शिवचरण वावळे

नांदेड : महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची लालपरी अगोदरच तोट्यात आहे. त्यातच ‘कोरोना’ व्हायरसच्या भीतीने २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे लालपरीचीही चाके जागेवरच थांबली. परिणामी अगोदरच तोट्यात असलेल्या लालपरीच्या नांदेड विभागातील तीन हजारापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्याने हे कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. 

नांदेड विभागात तीन हजार ३०० इतके कर्मचारी तर, ५० ते ५२ शिकाऊ उमेदवार असे मिळून तीन हजार ३५० इतके कर्मचारी आहेत. यातील बहुतेक कर्मचाऱ्यांना १२ ते १५ हजार रुपये पगार आहेत. तर जे कर्मचारी सेवानिवृत्तीकडे वाटचाल करतात, त्यांना शेवटी ४५ ते ५० हजार इतका पगार हातात पडतो. शिवाय शिकाऊ उमेदवारांना साडेसात ते आठ हजार ८०० इतके विद्यावेतन दिले जाते. 

पगाराची चिंता लागली

ब्रिक्स कंपनीला दिलेल्या स्वच्छता टेंडरमुळे आणि भाडेतत्वावर सुरु असलेली शिवशाही बंद असल्यामुळे नांदेड विभाग रोज किमान दहा लाख रुपयाने तोट्यात आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी विभागाने विविध उपाययोजना सुरु केल्या होत्या. त्यातुन काही फायदा होईल असे वाटत असताना लालपरीवर ‘कोरोना’चे संकट ओढवले. परिणामी एसटीचे कंबर्डेच मोडले असून, कर्माचाऱ्यांना आता पगाराची चिंता लागली आहे. त्यासाठी विभागाने सवलत मुल्य म्हणून ३०० कोटींची मागणी केली होती. मात्र, विभागास केवळ १५० कोटी रुपये मिळाल्याचे समजते. 

कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला
नेहमी वेळेवर होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार लांबणीवर पडल्याने कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सध्या नांदेड विभागात चतुर्थ श्रेणी, चालक - वाहक- मेकॅनिक व अधिकारी आणि लिपीक अशी तीन प्रकारची वर्गवारी केली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पगार, चालक, वाहक, मेकॅनिक यांना ७५ टक्के पगार तर अधिकारी व लिपिक यांना मात्र ५० टक्के इतका पगार दिला जाणार आहे. असे असले तरी, मागील आठवड्यात विभागाच्या कार्यशाळेतील १२५ कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात आला. भांडारातील कर्मचाऱ्यांना अद्याप पगाराची प्रतिक्षा कायम आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या पगारी लवकरच होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र लवकर कधी? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.  


 

जिल्हा ते तालुका बससेवा सुरु व्हावी
ज्या शहरात कोरोनाने मोठ्या प्रमाणावर पाय पसरले आहे. ज्या शहरात कोरोनाचा अद्याप शिरकावच झाला नाही किंवा अत्यल्प आहे अशा शहरांसाठी रेड, येलो आणि ग्रीन असे तीन झोन तयार करण्यात आले आहेत. नांदेड जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये येतो. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळुन पोलिस बंदोबस्तात नांदेड जिल्हा विभागांतर्गत जिल्हा ते तालुका अशी बससेवा सुरु करण्यास हरकत नाही. 
- पी. आर. इंगळे (इंटक संघटना)

केंद्र सरकार काय निर्णय घेणार 
नांदेड विभागांच्या एसटी कर्मचारी यांच्या पगासाठी दिडशे कोटी रुपये प्राप्त झाल्याची अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु उद्या पर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारी होण्याची शक्यता आहे. ग्रीन झोनमधील शहरांसाठी केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
-अविनाश कचरे (विभागीय अधिकारी नांदेड )
   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT