file photo 
मराठवाडा

अजूनही प्रवाशांची वाट बघतोय रिक्षावाला ! 

दिलीप मोरे

देवगावफाटा (जि.परभणी) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या या लाॅकडाउनमध्ये जनजीवन सुरळीत व्हावे व अर्थचक्रला गती मिळावी, यासाठी शासनाने काही सवलती दिल्या आहेत. यामध्ये दोन प्रवाशांसह रिक्षा प्रवासाला परवानगी देण्यात आली. पण या परवानगी नंतरही प्रवासी मिळत नसल्यामुळे रिक्षाचालकांना देवगावफाटा (ता. सेलू) बसथांब्यावर प्रवाशांची वाट बघत थांबावे लागत आहे. यामुळे रिक्षाचालकांची अवस्था ‘वाट बघतोय रिक्षावाला’, अशी झाली आहे.


देवगावफाटा परिसरात सुमारे शंभर तर लगतच्या गावातही मोठ्याप्रमाणावर ऑटोरिक्षाची संख्या आहे. ऑटोरिक्षा हे सर्वसामान्य ते मध्यमवर्गीय जनतेसाठी प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. अनेकांकडून जवळचा प्रवास करण्यासाठी ऑटोरिक्षाला प्राधान्य दिले जाते. लाॅकडाउनमध्ये शासनाने दोन प्रवासी व एक चालक अशी रिक्षाला परवानगी दिली आहे. परंतु प्रत्यक्षात या मर्यादांमुळे व तसेच नागरिकांच्या मनात कोरोनाबद्दल असलेल्या भीतीने ऑटोरिक्षाला प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकांचे व्यवसायाचे साधन हे ऑटोरिक्षाच असल्यामुळे त्यातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशांवर तर पार उपासमारीची वेळ आली आहे. त्यात काहींनी बँक किंवा खासगी कर्ज काढून चालविण्यासाठी ऑटोरिक्षा घेतलेली आहे.

दोनच प्रवासी बंधनकारक

मात्र, लाॅकडाउनमुळे अडीच महिन्यांपासून ऑटोरिक्षांची चाके थांबल्याने आता या ऑटोरिक्षा चालकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने जरी शिथिलता दिली असली तरी ऑटोरिक्षात दोनच प्रवासी आदी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बंधनकारक केले., इतकेच नव्हे तर कारवाईच्या सुचनाही देण्यात आल्याने ऑटोरिक्षाची चांगलीच कोंडी झाली आहे. दरम्यान, केवळ दोनच प्रवाशांसाठी ऑटोरिक्षा काढणे परवडत नसल्याने, अनेक ऑटोरिक्षा अजूनही घरीच उभे असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे.


प्रवाशांअभावी वाढली डोकेदुखी
ऑटोरिक्षा चालकांसाठी ऑटोरिक्षा हेच उपजीविकेचे साधन आहे. मात्र, अडीच महिन्यांपासून ऑटोरिक्षा बंद असून, आता सुरू झाले असले तरी अजूनही बहुतांशजण ऑटोरिक्षाने प्रवास करणे टाळत आहेत. दुसरीकडे शासनाने एकावेळी फक्त दोनच प्रवाशांना ऑटोरिक्षातून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. अनेकदा दोनपेक्षा अधिक प्रवासी समोर उभे दिसूनही भाडे नाकारावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांअभावी ऑटोरिक्षा चालकांची डोके वाढलीचे चित्र आहे.


अडीच महिन्यांपासून कोणतेही काम नाही. ऑटोरिक्षा बंद असल्याने उत्पानाच साधनच थांबलं आहे. सध्या रिक्षा वाहतूक सुरू आहे. परंतु प्रवासीच नसल्याने आता पूर्वीप्रमाणे धंदा होत नाही. जो होत आहे त्यातून रोजचा घरखर्च भागविणे कठीण झाले आहे.
- नागनाथ सोन्ने, रिक्षाचालक.
 


आमच्यासाठी केवळ ऑटोरिक्षा हेच उपजीविकेचे साधन आहे. कोरोनाच्या भीतीमुळे रस्त्यावर ऑटोरिक्षा आणायला भीती वाटते, गेल्या अडीच महिन्यांपासून ऑटोरिक्षा बंद आहेत. आता सुरू झाले आहेत मात्र प्रवासी मिळत नसल्याने शासनाने आमच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- गणेश जाधव,रिक्षाचालक
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT