File Photo
File Photo 
मराठवाडा

जोखमीचे काम करणाऱ्यांना हवेय ५० लाखांचे विमा कवच, कुठे ते वाचा... 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राज्यात दिवसेंदिवस ‘कोरोना’चा प्रादूर्भाव वाढत आहे. रोज ‘कोरोना’ग्रस्तांची नवीन आकडेवारी पुढे येत आहे. तेव्हा कोरोनाला रोखण्यासाठी केवळ आरोग्य कर्मचारी पुरेशे ठरणार नाहीत. म्हणून पुणे मुंबई, नागपूर, आमरावती यासह बाहेर देशातुन शहर आणि गावात दाखल झालेल्या प्रवाशांना शोधण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच यांच्यावर देखील सोपविले आहे. त्यामुळे आरोग्य, आशा वर्कर आणि पोलिसांप्रमाणाचे शासनाने गावपातळीवर कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना देखील ५० लाखांचे विमा कवच द्यावे, अशी मागणी ‘कृषी पदवीधर’ ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर मुंगल यांनी जिल्हा परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

‘कोरोना’ विषाणूच्या प्रसारावर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनात महत्वाची भूमिका घेत स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधा पुरविण्याचे जोखमीचे काम करणाऱ्या ग्रामसेवकांना ५० लाखांचे जीवन विमा कवच मंजूर करण्यात यावे, अशी मागणी कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेस करण्यात आली.

सोलापूर, पुणेप्रमाणे निर्णय घ्यावा
‘कोरोना’ राष्ट्रीय आपत्ती संबंधाने क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या ग्रामसेवकांना पुणे जिल्हा परिषदेने एक कोटी तर सोलापूर जिल्हा परिषदेने २५ लक्ष रुपयांचे विमा कवच नुकतेच मंजूर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपातळीवर काम करणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना जीवन सुरक्षा कवच म्हणून ५० लक्ष रुपयांचा विमा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे राज्य प्रतिनिधी शिवकुमार देशमुख यांनी दिली.

या शिष्टमंडळाने घेतली भेट
जिल्हाध्यक्ष मधुकर मुंगल, कार्याध्यक्ष भास्कर कापसे, कोषाध्यक्ष अनूप श्रीवास्तव, सचिव सुनील पारडे, गुलाब वडजे, अनिल बिलोलवार, सुदर्शन कपाळे, सुप्रिया घाटे, प्रशांत कोकाटे, राजशेखर सोनसळे, एस. डी. पारसेवार, विठ्ठल सूर्यवंशी, जयप्रकाश फरसे, श्याम तरोडे, डॉ. अदमपूरकर व्ही. जी, आनंद कदम, आशा रेशमलवार, गजानन बच्चेवार आदींनी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांना निवेदनाची प्रत सादर करून जिल्ह्यातील ग्रामसेवकांना ५० लाख रुपयांचे विमा कवच मंजूर करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT