police darodekhor batmi 
मराठवाडा

राज्य महार्गावर दरोडेखोर - पोलिसांत चकमक, हवेत गोळीबार ः पोलिस निरीक्षक जखमी

बाळासाहेब लोणे

गंगापूर, (जि. औरंगाबाद)  : औरंगाबाद-पुणे महामार्गावर मध्यरात्री दीडच्या सुमारास दरोडेखोर व पोलिस यांच्यात चकमक होऊन पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यात एका दरोडेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरोडेखोरांच्या दगडफेकीत पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे जखमी झाले आहेत. महिनाभरातील ही दुसरी घटना असून भेंडाळा (ता. गंगापूर) शिवारात शनिवारी (ता. एक) ही कारवाई करण्यात आली.

याविषयी अधिक माहिती अशी की, येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरवसे यांना पाच चोरटे दरोड्याच्या तयारी करत असून घातक शस्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलीस निरीक्षक सुरवसे यांच्या पथकाने तीन वेगवेगळ्या मार्गाने महामार्गाकडे धाव घेतली. दरोडेखोर अंतापूर शिवारात पळून जात असताना यातील एका आरोपीला पोलिसांनी शिताफीने पकडले. पकडलेल्या आरोपीला सोडण्यासाठी साथीदार दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेऊन पोलिसावर दगडफेक सुरु केली. यात पोलीस निरीक्षक सुरवसे यांच्या पायाला व छातीला दगड लागल्याने जखमी झाले. पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी हवेत गोळीबार केला. आरोपी फायरच्या आवाजाने पळून गेले.

हे आहेत आरोपी

आरोपी अमोल सोपान पिंपळे (वय : १९) , आदित्य शामराव पवार (गुरुधानोरा ता. गंगापूर),दादा  गोविंद साळुंके (रा. खोकर), साजन पवार (टाकळीबाण. ता. श्रीरामपूर) सागर यांचा समावेश असून, त्यांच्याकडे पल्सर (काळा रंग), दोरी व सत्तूर आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महिन्यातील दुसरी घटना

तीन डिसेंबरच्या मध्यरात्री औरंगाबाद-पुणे महामार्गावरुन जात असताना कळमी पुलावर अज्ञात पाच दरोडेखोरांनी एक कार अडवून कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली होती. पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी धडक कारवाई करत आरोपीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Gold Smuggling Sangli Man Arrested : आसाममध्ये सोने तस्करी करणारा संशयित दिघंचीचा? सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई, 55 कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

SCROLL FOR NEXT