nanded 
मराठवाडा

आरएसएस प्रणित भाजप सरकार देशावरील संकट : कवाडे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : देशातील आरएसएसप्रणीत भाजपा सरकार हे देशावरील व संविधानावरील भयानक संकट आहे. हे सरकार आणीबाणी आणु पहात आहे. अशा या असंहिष्णुतावादी सरकारला हाकलण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत पीपल्स रिपब्लीन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. 

हिंगोली येथे पक्षाचे प्रमुख नेते गणेश पडघण यांच्या जाहीर नागरी सत्कारानिमित्त ते जाण्यासाठी नांदेड येथे आल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक बापुराव गजभारे, विनेद भरणे, गणेश उणवणे, शशी उणवणे यांची उपस्थिती होती. पत्रकार  परिषदेत बोलतांना जोगेंद्र कवाडे म्हणाले की,  देशात सध्या भाजपा सरकार अराजकात माजवीत आहे. देशाची संहिष्णुता धोक्यात असून देश व संविधान संकटात आहे. देशात जातीय, धर्मांध शक्तीचा वावर मोठ्या प्रमाणात होत असून सामाजीक दुजाभाव केल्या जात आहे. ही बाब देशासाठी अत्यंत घातक आहे. विद्यापीठ, न्याय, सीबीआय, रिझर्व बँक, शिक्षण या क्षेत्रात हे सराकर हस्तक्षेप करीत आहे.

देशाच्या एकसंघतेला, एकतेला तडा देण्याचे षडयंत्र सुरू असल्याच आरोप आमदार कवाडे यांनी केला आहे. एकीकडे कुभमेळ्यासाठी चार हजार कोटीचा निधी तर दुसरी देशात भुकबळीने अनेकजण मरत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. देशात सर्वत्र आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते की काय अशी शंका व्यक्त केल्या जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cancer Medicine: बेडकाच्या आतड्यात सापडलं कॅन्सरवरील औषध! उंदरावर केलेला प्रयोग यशस्वी

Pune Cyber Crime : हडपसरमध्ये सायबर चोरट्यांकडून सव्वा कोटींची फसवणूक; शेअरबाजारात जबरदस्त परतावा देण्याचे आमिष!

Pune Police Interstate Arrest : हडपसर खुन प्रकरणातील फरार आरोपी वैभव जाधव ‘हरिद्वार’हून अटक; २० महिन्यांचा शोध अखेर यशस्वी

Solapur Farmer Protest : दामाजी कारखाना आर्थिक ताणातही शेतकऱ्यांना न्याय देत पुढे; अध्यक्ष पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले!

Eknath Shinde : "महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय; बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका"– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

SCROLL FOR NEXT