file photo 
मराठवाडा

संचारबंदी शिथील होताच उसळली गर्दी

कैलास चव्हाण

परभणी : तीन दिवसाच्या संचारबंदीनंतर शिथिलता देताच  शहरात सोमवारी (ता. २०) सकाळपासून गर्दी उसळली. लॉकडाउनचे कोणतेही नियम न पाळता किराणा, भाजीपाला खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले. दुपारी दोन वाजेपर्यंत सूट दिल्याने दुपारपर्यंत गर्दी कायम होती. एकप्रकारे नागरिकांनी कोणत्याप्रकारे भान न ठेवता गर्दी केली.

परभणीत कोरोचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर परभणीत शुक्रवार (ता. १७) पासून तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामध्ये फळे, भाजीपाला, दूध यांनाही बंदी घातली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी केवळ दूध विक्रेत्यांना घरोघरी दूध विक्री करण्याची मुभा दिली होती. तर भाजीपाला, फळे, किराना दुकाने बंद होती. त्यामुळे संपूर्ण शहरात सन्नाटा पसरला होता. रविवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने दूध, फळे, भाजीपाला, किराना  व अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते दुपारी दोन वाजेर्यंत सुरू राहणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पहाटे सहा वाजल्यापासून शहरात सगळीकडे गर्दी दिसून आली.

हातगाडे येण्यास सुरवात

पाथरी रस्त्यावरील भाजीपाला मार्केट सुरू झाल्याने सकाळी सात वाजल्यापासून शहरातील मुख्य रस्त्यावर अंतर्गत वसाहतीमध्ये हातगाडे येण्यास सुरवात झाली. शहराच्या मुख्य बाजारपेठेतदेखील हातगाड्यावर भाजीपाला विक्रीस सुरू होताच मोठी गर्दी उसळली. नारायणचाळ, स्टेशन रस्ता, गव्हाणे चौक, गांधी पार्क आदी भागात गर्दी दिसून आली. वसमत रस्त्यावर अनेक ठिकाणी गर्दी होती.


हेही वाचा व पहा - कोरोनाच्या लढ्यात डॉ. रमण गंगाखेडकर यांनी फडकवला नांदेडचा झेंडा...

 

कृषी केंद्राची दुकाने बंद
देशमुख हॉटेल परिसरात व्यापाऱ्यांनी भाजीपाला विक्री केली. या ठिकाणीदेखील कोणतेही नियम न पाळता मोठी झुंबड उडाली. परभणी शहरातील कच्छी लाईन भागात किराणा दुकाने उघडताच तुफान गर्दी उसळली. प्रत्येक दुकानावर गर्दीच दिसून आली. रस्ते पूर्णत: गजबजून गेल्याने पायी चालताना कसरत करावी लागत होती. त्यासोबतच नवा मोंढा परिसरात असलेल्या होलसेल किराणा दुकानासमोर तोबा गर्दी झाली होती. हा परिसरदेखील गजबजून गेला होता. मोंढ्यात केवळ भुसार मालाची दुकाने सुरू होती. कृषी केंद्राची दुकाने बंद होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: चाचपडणारा सूर्यकुमार, BCCI ला झालाय नकोसा, पण एका व्यक्तीमुळे अंतिम निर्णय रखडलाय; कोण आहे तो?

Marathi Live News update: आळंदीत माऊली मंदिरात दानावर सेवकाचा डल्ला

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊसचं आमंत्रण; अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची दिल्लीत उच्चस्तरिय बैठक

Bank Layoff: IT नंतर आता बँकिंग क्षेत्रातही नोकरकपातीचं वादळ; AI आणि रोबोट्समुळे 7000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Private School Fees: खाजगी शाळा शैक्षणिक सत्रापूर्वी सरकारी परवानगीशिवाय शुल्क वाढवू शकतात, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT