रोषणाईनेसह उंच आकाशपाळणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.  
मराठवाडा

बाबासाहेब महाराजांची यात्रा गर्दीने फुलली

विलास शिंदे

सेलू (जि. परभणी) : शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्‍गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचा (व्यंकूशाह) यात्रा महोत्सव बच्चे कंपनीसह महिला, पुरुष, युवक, युवतींच्या गर्दीने फुलून गेला आहे.

यात्रा महोत्सवाचे हे २१८ वे वर्ष आहे. चार डिसेंबरपासून श्रीमद् भागवत कथा, कीर्तन, भजन, पारायण आदी अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. बुधवारपासून (ता. ११) दत्त जयंतीनिमित्ताने यात्रेत औरंगाबाद, देऊळगाव राजा, जालना, वाशीम, पुसद, नांदेड, धर्माबाद, परभणी, लोणार, परतूर, हिंगोली, बुलडाणा, अमरावती आदी दुरवरच्या व्यापाऱ्यांसह काही स्थानिक व्यापाऱ्यांकडून विविध दुकाने थाटली आहेत. आठवडाभरापासून हळूहळू यात्रा गर्दीने फुलत गेली. शुक्रवार, शनिवारचा आठवडे बाजार व रविवार सुटीच्या दिवशी दर्शनासाठी ग्रामीणसह शहरातील यात्रेकरूंची गर्दी आहे. त्यामुळे रेवड्या, साखर फुटाणे, पेढा, हळदकुंकू, पानफुले, श्रीफळ आदी प्रसादाच्या साहित्याची दुकानेही लक्षवेधी ठरत आहेत. आणखी तीन-चार दिवस यात्रा गर्दी खेचेल, असे चित्र आहे.

बच्चे कंपनीची मजाच मजा...
बच्चे कंपनीसाठी तीन ते चार ठिकाणी मिकी माऊस, जंपिंग जपांग उभे करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी उड्या मारण्याचा मनसोक्त आनंद बच्चेकंपनी लुटत आहेत. याशिवाय बेबी कार, छोटी विमाने, हेलीकॉप्टर, घोडे, उंट, स्कूटी, मोटारसायकल लावलेली मेरी गो राऊंड, छोटी नाव, रेल्वेगाडीने लहान मुलांना भुरळ घातली आहे, तर उंच आकाश पाळणे, गतीने फिरणाऱ्या ब्रेक डान्स, व्हील गो राऊंड, पन्नालाल गाढवाच्या करामती पाहण्यासाठी युवक, महिला, पुरुष व महाविद्यालयीन, शाळकरी मुलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

गृहोपयोगी वस्तू, दागिन्यांची भुरळ...
ग्रामीण भागातील नागरिक दुपारी, तर स्थानिक सायंकाळी गर्दी करत आहेत. यात्रेत खरेदीसाठी महिला, युवतींची गर्दी लक्षणीय आहे. पर्स, बांगड्या, कानातले, फॅशनेबल स्वस्त आणि मस्त अलंकारांनी महिला, युवतींना भुरळ घातली आहे. यासोबत पिना, बक्कल, चप्पल, विविध व्हरायटीतील बॅग, डबे, कृत्रिम फुले, फुलदाणी, लाटणे, प्लेट, कप, बशी, मूर्ती, क्रॉकरी, फोटो, की-चैन आदींसह विविध गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. या शिवाय थंडीचे दिवस असल्याने स्वेटर,  मफलर, कानाटोप्या आणि ठराविक किमतीतील हरमाल खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.

खवय्यांसाठी मेजवाणी...
पाव भाजी, मिसळ, दोसा, पाणीपुरी, दाबेली, मंच्युरियन, भेळमसाला, भजी, जिलेबीवर ताव मारण्यासाठी खवय्यांची झुंबड उडत आहे. याच सोबत  खास चिवडा, मालकुवा, गोडशेव, पपडी आदी खाद्यांची दुकानेही लागली आहेत. खास पान, कुल्पी, आईस्क्रीम, ज्यूस, तीळ रेवड्या, अननस बाईट्सची बच्चेकंपनीत मोठी क्रेझ आहे. खवय्यांसाठी यात्रा जणू मेजवाणीच ठरत आहे.

महागाई अन् हौस मजा...
वाढत्या महागाईचे चटके सर्वसामान्य माणसाला बसत असल्याने यात्रांवरही याचा परिणाम होत आहे. मनोरंजनाच्या साधनासोबत काही वस्तूंचे दर गतवर्षी पेक्षा वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.  मात्र, हौस आणि मौजमजेखातर या वार्षिक महोत्सवाचा आनंद महागाईपलीकडचा आहे, असे यात्रेकरू सांगत आहेत. काही वस्तू बाजारभावापेक्षा कमी दराने मिळत असल्याने यात्रेतील खरेदीकडे ग्राहकांचा ओढा आहे.


टुकार टोळक्यांकडे पोलिसांचा कानाडोळा....
गर्दीच्या जोडली बघे आणि टुकार टोळक्यांवर पोलिस प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नाही. विशेषतः सायंकाळी सात ते साडेदहापर्यंत यात्रेत चांगलीच गर्दी उसळत आहे. वाहनांचे पार्किंग वगळता गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा अभाव दिसत आहे. यामुळे महिला, युवतींना धक्का बसणे, रेटारेटी, चित्रविचित्र आवाज काढून गोंधळ करणे असे प्रकार टुकार टोळक्यांकडून होतांना दिसत आहेत. याचा खरेदीसाठी आलेल्या महिलांसह पुरुषांनाही त्रास होत आहे. त्यात काही सराईत चोरटेही हात साफ करून घेण्याच्या घटना यात्रेत नवीन नाहीत. पोलिस मात्र याकडे सपशेल कानाडोळा करीत आहेत.


यात्रेकरूंसाठी आनंदपर्वणी...
महागाई वाढली असली, तरी यंदा यात्रेत चांगले गिऱ्हाईक आहे. बाहेरच्या व्यवसायिकांचे दर जास्त आहेत, मात्र स्थानिकचा असल्याने दरात वाढ केली नाही. लोकांसाठी ही यात्रा आनंदपर्वणीच आहे. 
- राम कुकडे, पावभाजी विक्रेता


वैभवशाली सांस्कृतिक परंपरा...
सेलू शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचा हा यात्रा महोत्सव म्हणजे सेलू तालुकावासीयांसाठी एक पर्वणीच असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण यात्रेचा आनंद घेतात. बदलत्या संस्कृतीमध्ये यात्रांचे स्वरूप जरी बदले, तरी शहराची एक वैभवशाली सांस्कृतिक परंपरा म्हणून ती जपली जाते. आजही यात्रेकरूंचा ओढा कमी झालेला नाही.
- शिवशंकर भाग्यवंत, यात्रेकरू

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT