file photo 
मराठवाडा

अखेर ‘साध्वी’ला पोलिसांनी शोधले

प्रल्हाद कांबळे

नांदेड : विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेनी कौटूंबीक वादातून आपल्याच मुलीला शाळेतून पळवून नेऊन अज्ञात ठिकाणी आपल्यासोबत ठेवले होते. गुप्त माहितीवरून विमानतळ पोलिसांनी अपहरण झालेल्या बालिकेला तिच्या आईसह शनिवारी (ता. चार) रात्री आठ वाजता ताब्यात घेतले. ही घटना १८ दिवसापूर्वी गुरूवारी (ता. १९) डिसेंबर रोजी घडली होती. 
 
गुरूनगर येथील रहिवासी संजय वायफळकर याची ‘साध्वी’ नावाची साडेपाच वर्षीय बालिका आयडियल किड्स पब्लिक स्कुलमध्ये शिक्षण घेते. नेहमी प्रमाणे संजय वायफळकर हे मुलीला (साध्वीला) शाळेत सोडून घरी परत गेले. यावेळी दुसऱ्या रस्त्याने साध्वीची आई व अनोळखी एकजण हे थोड्या वेळाने गुरूवारी (ता. १९) डिसेंबर रोजी शाळेत जाऊन साध्वीला पळवून नेण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु शाळेच्या शिक्षिका श्रीमती कंधारे व श्री साखरे त्यांनी विरोध करत त्यांच्या हातावर ब्लेडने मारून जखमी केले. त्यानंतर साध्वीला घेऊन फरार झाले. याप्रकरणी संजय वायफळकर यांनी विमानतळ पोलिसांकडे ता. २० डिसेंबर रोजी तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करून तब्बल पाच दिवसानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध साध्वीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटना कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांनी दिली.

आनंदनगर परिसरातून घेतले ताब्यात 
या प्रकरणाचा तपासाची चक्रे वेगाने फिरवत श्री. ननवरे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन केले. अख्खे नांदेड व परिसर त्यांनी पालथा घातला. परंतु साध्वी काही त्यांना सापडत नव्हती. अखेर शनिवारी त्यांच्या गुप्त माहितगाराने दिलेल्या माहितीवरून संजय ननवरे, फौजदार बेग यांनी महिला कर्मचाऱ्यांसह आनंदनगर परिसरातील एका घरी छापा टाकला. यावेळी त्यांनी साध्वी व तिच्या आईला ताब्यात घेतले. पोलिस उपाधिक्षक अभिजीत फस्के यांच्या समोर हजर करून साध्वीच्या पालकाला बोलावून घेतले होते. 

साध्वीचा मुक्काम शिशुगृहात
दरम्यान हे प्रकरण बालकांच्या संदर्भात असल्याने बालकल्याण समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांच्या अधिकारानुसार साध्वीला आनंदनगर येथील एका शिशुगृहात दाखल केले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर साध्वी हे आईकडे किंवा तिच्या वडिलाकडे जाऊ शकते. कौटुंबीक वादातून घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेला चांगलीच कसरत करावी लागली. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि पोलिस उपाधीक्षक (शहर) अभिजीत फस्के यांनी कौतूक केले.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT