गुंज बुद्रूक (ता.घनसावंगी) येथील गजानन तौर यांच्या शेतात बहरलेले करडईचे पीक.
गुंज बुद्रूक (ता.घनसावंगी) येथील गजानन तौर यांच्या शेतात बहरलेले करडईचे पीक. 
मराठवाडा

 गुंजला बहरली करडईची शेती 

लक्ष्मीकांत कुलकर्णी

कुंभार पिंपळगाव (जि.जालना)  - गुंज बुद्रूक परिसरात करडईची शेती बहरली आहे. लाल- पिवळ्या फुलांनी करडईची शेती येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. पिकातून एकरी आठ क्विंटल प्रमाणे शंभर क्विंटलच्या पुढे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. 

कधी काळी करडईचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जात होते, करडईपासून घरी तेल केल्या जात होते आणि हेच तेल शेतकरी वर्षभर वापरत होते तर काही शेतकरी घाण्याद्वारे तेल काढणाऱ्यांना करडई विकत होते यामुळे शुध्द करडईचे तेलही सहज उपलब्ध होत होते. त्याचप्रमाणे तेल काढल्यानंतर उरलेल्या चोथ्यापासून जनावरांसाठी पेंड मिळत होती. कालांतराने ज्वारीच्या पिकात आंतरपीक म्हणून करडईचे पाटे घातल्या जाऊ लागले, मात्र पीक काढणारी,बडवणारी आणि उधळणारी, खळे करणारी शेतमजूर मिळेनासे झाले. हळूहळू हे पीक घेणचं बंद झाल आता करडई पेरली तरी भाजी विकल्या जाते, पीक वाढू दिल्या जात नाही. अपवादात्मक एखादा शेतकरी करडईचे पीक घेतो व खाजगी तेलघाण्यावरून तेल काढून आणतो.

गुंज बुद्रूक(ता.घनसावंगी)येथील युवक शेतकरी गजानन साळीकराम तौर यांनी १२ एकरवर, सचिन काजळे यांनी दोन एकरवर, नेताजी तौर यांनी सहा एकरवर तर कुंभार पिंपळगाव येथील शेतकरी गोपाल राधेशाम लोया यांनी लिंबोणी शिवारात नऊ एकरवर करडईची लागवड केली आहे. 


गजानन तौर दरवर्षी शेतात वेगवेगळे प्रयोग करून वेगळी पिके घेतात. लिंबी येथील प्रयोगशील शेतकरी सतीश तौर यांच्या मार्गदर्शनामुळे यावर्षी त्यांनी नोव्हेंबर महिन्यात करडईची १२ एकर क्षेत्रात लागवड केली तर त्यांचे मित्र श्री काजळे यांना दोन एकर क्षेत्रावर व श्री तौर यांना सहा एकरवर लागवड करायला लावली.त्याचप्रमाणे कुंभार पिंपळगाव येथील शेतकरी गोपाल राधेशाम लोया यांनी लिंबोणी शिवारात परभणी बारा या जातीच्या करडईची नऊ एकरवर नवीन प्रयोग म्हणून पेरणी केली. 
यावर्षी पाऊस चांगला असल्याने पीकही चांगलेचं बहरले.विशेष म्हणजे या पिकाला फक्त एकच पाणी दिले, एकदा खत आणि फवारणी असा २५ हजार रुपये खर्च झाला.पीकही फुलोऱ्यात असून बोंडात करडई परिपक्व झाल्या आहेत. लाल पिवळ्या फुलांनी करडईची शेती येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. पिकातून एकरी आठ क्विंटल प्रमाणे शंभर क्विंटलच्या पुढे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. करडईला पाच हजार दोनशे रुपये क्विंटलच्या जवळपास भाव आहे. लवकर लागवड केल्याने उत्पन्नही चांगले मिळेल. 
सध्या बाजारात करडईचे तेल मिळते. या तेलाचा २१० रुपये लीटरचा भाव आहे तर ठोक १९ हजार ५०० रुपये क्विंटलचा भाव आहे. करडईची पेंडीचा भाव चार हजार रुपये क्विंटल आहे. 

असे बनायचे करडईचे तेल 

पंख्याद्वारे करडी भरडुन त्याची गोडंबी काढल्या जायची.ही गोडंबी घाण्यात टाकुन एक बैल जुंपुन बैलाचे डोळे बंद करून घाणा फिरवला जायचा.गोडंबीचा चोथा झाल्यावर घाण्यातुन तेल खाली यायचे व व चोथ्याची पेंड तयार केल्या जायची.करडईच्या भुशाचा उपयोग करून भट्टी पेटवल्या जायची त्यावर तेल कढवुन फिल्टर केल्या जायचं.त्याचा सुगंध सर्वत्र दरवळायचा. गावात आठ ते दहा घाणे चालु होते.असे चाळीस वर्ष घाण्यावर काम केलेले तुळशीराम नाईक यांनी सांगितले. 

घरी मोठ्या प्रमाणात शेती आहे मात्र मजुर,औत व खर्चामुळे शेती करणे अवघड झाले आहे. पारंपारिक पीक घेणे परवडत नाहीत. गोदावरी परिसरात डुकरांमुळे पिकांचे सतत नुकसान होते. एकही पीक पदरात पडत नाही, नुकसान पाचवीला पुजलेलेच. मात्र यावर्षी नवा प्रयोग म्हणून करडईची शेती करायचा निश्‍चय केला. करडईला काटे असल्यामुळे डुकरे खात नाहीत, वन्यप्राण्यांकडुनही नुकसान होत नाही. पीक चोरी जायचे काम नाही, शिवाय आता करडई काढणीसाठी हार्वेस्टर उपलब्ध झाल्याने यांत्रिकी शेती म्हणून हा प्रयोग केला. 
गजानन तौर,शेतकरी 

शेती करताना मनुष्यबळाची अडचण येते यामुळे नविन प्रयोग म्हणून करडईची नऊ एकरवर पेरणी केली आहे. कमी खर्चात चांगले उत्पादन शिवाय पिकाला कुठलीच अडचण येत नाही.बाजारात मालाला भावही चांगला मिळतो. 
गोपाल लोया,शेतकरी 

डुकरांपासून शेती मालाचे मोठे नुकसान होते यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी,गव्हाच्या बाजूंनी करडईचे काटेरी पीक घ्यावे त्याचप्रमाणे परिसरातील लोकांना शुध्द करडईचे तेल मिळावे या उद्देशाने तालुक्‍यात जवळपास १८० एकरवर करडईच्या पिकाची पेरणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होणार असून लवकरच जालन्यात युनिट सुरू करून लोकांना शुध्द तेल उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. यासाठी हा प्रयोग केला आहे. 
सतीश तौर, 
माउली हार्वेस्टर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT