साहेबराव घुले व पत्नी पद्‌मीबाई घुले.
साहेबराव घुले व पत्नी पद्‌मीबाई घुले. 
मराठवाडा

‘त्या’ कुटुंबाला खरं जगणं कळलंय...

सुषेन जाधव

औरंगाबाद - ‘‘सरपंच म्हटलं की आमच्याकडे इस्त्रीची कापडं घालून रोज तालुक्‍याला जाणारा, भलंमोठं घर, दारात गाड्या असा माणूस डोळ्याम्होरं येतो. मग तो विद्यमान सरपंच असू दे, नाही तर माजी. पण माझ्या काळात मी सरपंच असतानीबी बायकू दुसऱ्याच्या रानात रोजानी कामाला जात व्हती. पुढं तीबी सदस्य झाली; पण कधी बडेजाव मिरीवला नाही. आताबी ह्या वयात कारभारणीला साथ देत घरी बसतो...’’ अशा शब्दांत माजी सरपंच साहेबराव मारुतीराव घुले यांनी आपल्या भावना ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केल्या.

साहेबराव हे बीड जिल्ह्यातील केळगाव (ता. केज) येथील रहिवासी. केळगाव-बेळगाव गट ग्रामपंचायतीचे सलग दोनवेळा बिनविरोध सरपंच असलेल्या साहेबरावांना गावात ‘अप्पा’ नावाने ओळखतात. केळगावच्या वस्तीवर पोचलो तेव्हा पत्र्याच्या भिंती अन्‌ पत्र्याचेच छप्पर असलेल्या आपल्या घरी अर्धांगवायूमुळे आजारी असलेल्या आपल्या पत्नी पद्मीनबाईच्या खाटेजवळ अप्पा बसलेले होते. त्यांचा हा रोजचाच दिनक्रम आहे. १९८४ ते १९९४ या कालावधीत सरपंच म्हणून त्यांनी सलग दोनवेळा काम पाहिले आहे.

आजघडीला त्यांचे वय झाले असले तरी ते अजूनही चालतात, फिरतात. मात्र सरपंच म्हणून बडेजाव मिरविण्यापेक्षा आपल्या कारभारणीसोबत आयुष्य घालवणं, तिची सेवा करणं यात आपण धन्यता मानत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या पत्नीही २००२ ते २००७ यादरम्यान ग्रामपंचायत सदस्य होत्या. ‘दुष्काळा’तही ओलावा असणाऱ्या या कुटुंबाला खरं जगणं कळलंय, अशी भावना केळगावशेजारच्या मस्साजोग या गावातील जालिंदर देशमुख यांनी व्यक्त केली.

गावासाठी जे केलं ते मन लावून केलं. मोफत खतं वाटली. बायकूनंबी गावातल्या महिलांच्या अडचणी सोडिल्या. मी कामानिमित्त बाहेरगावी गेलो की कुणी कधीबी काहीही सांगितलं की बायकू धावून जायची. सरपंच होतो तरीही आज राहायला साधं पत्र्यांचं घर आहे.
- साहेबराव घुले, केळगाव 

मी कामाची लाज कधी बाळगली नाय. रोजंदारीसह गावकारभारातही सहभागी झाले. मला चार सुना हाईत. पण माझा मालक (पती) करीत असलेल्या सेवेमुळे मला जगायला आणखीनच बळ देतंय. अर्धांगवायूमुळे मी एका जागी पडून असले तरी दिवसभर ते माझ्यासोबतच बसलेले असतात. 
- पद्‌मीनबाई घुले, केळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT