बीड येथील पत्रकार परिषदेत उपस्थित अरविंद जगताप, सयाजी शिंदे. 
मराठवाडा

बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

सकाळ वृत्तसेवा

बीड - शहराजवळच्या पालवण येथे शासनाच्या वनविभागासह लोकसहभागातून सह्याद्री देवराई हा प्रकल्प तीन वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. वृक्षसंगोपनाची चळवळ अधिकाधिक व्यापक व्हावी, या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जात आहे. दोन वर्षांत या ठिकाणी एक लाख 64 हजार विविध जातींच्या वृक्षांची लागवड केली गेली आहे. 207 हेक्‍टर क्षेत्राचा हा परिसर लोकसहभागातून पूर्ण केला जात आहे. पालवणचा सह्याद्री देवराई हा प्रकल्प लवकरच सबंध महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्‍वास अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.

सह्याद्री देवराई परिसरात शनिवारी (ता. 21) सायंकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लेखक, पटकथा दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्यासह शिल्पकार किशोर ठाकूर, सतीश मोरे, सचिन चंदने, वृक्षतज्ज्ञ रघुनाथ ढोले, सह्याद्री देवराई प्रकल्पाचे सचिव मधुकर फल्ले (सातारा) यांच्यासह शिवराम घोडके, बीडच्या सहायक वनअधिकारी सोनाली वनवे उपस्थित होत्या. यावेळी डोंगर रांगेत वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली.

सयाजी शिंदे म्हणाले, सह्याद्री देवराई प्रकल्पातून ऑक्‍सिजन झोन तयार केला जात आहे. परिसरात विशिष्ट जातींची झाडे चिटकून लावली जात असून, यातून भविष्यात घनदाट जंगलाची निर्मिती केली जाणार आहे. परिसरात लिंब, पिंपळ, वड यासह विविध जातींची झाडे लावली जात आहेत. "येऊन, येऊन येणार कोण? झाडांशिवाय हायच कोण?' ही टॅगलाइन घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. स्थानिकांनीही या चळवळीत पुढाकार घ्यावा. 

 जानेवारीत पालवनला पहिले वृक्षसंमेलन 
सह्याद्री देवराई प्रकल्प अधिक परिणामकारक पद्धतीने राबवला जात असून, या ठिकाणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्राचे पहिले वृक्षसंमेलन होणार असल्याची माहिती सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांनी दिली. संमेलनाच्या तयारीसाठी व्यापक बैठका घेतल्या जात असून, बीडकरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा. संमेलनात जिल्ह्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार असून, याठिकाणी किमान 50 स्टॉल उभारले जाणार आहेत. त्यात फुलपाखरांच्या विविध जातींचे छायाचित्र प्रदर्शन भरवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zomato चे नवे CEO अलबिंदर ढींडसा कोण आहेत? 10000 कोटींचे मालक; दीपिंदर गोयलला विकली होती कंपनी

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! डाउन पेमेंटशिवाय घर घेता येईल का? आरबीआयचे नियम काय सांगतात? जाणून घ्या...

IND vs NZ, 1st T20I: न्यूझीलंडने जिंकला टॉस! भारताच्या संघात इशान किशन, रिंकू सिंगचे पुनरागमन, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग-११

कशी होते 'बिग बॉस मराठी'च्या स्पर्धकांची निवड? क्रिएटिव्ह डिरेक्टरने सांगितली आतली गोष्ट; म्हणतो- बिग बॉस तुम्हाला शोधतं...

Kavach System: रेल्वे अपघात रोखणं शक्य होणार, पश्चिम रेल्वेवर ‘कवच’साठी तयारी, ४३६ इंजिनांमध्ये तांत्रिक बदल!

SCROLL FOR NEXT