फोटो 
मराठवाडा

नांदेडात वाळू माफियांचा पुन्हा हल्ला 

बापू गायखर

लोहा (जिल्हा नांदेड) : राज्यात दिवसेंदिवस वाळू माफियांच्या गॅंगने सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यावर हल्ला करणे, अवैध वाळूची तस्करी करणे नित्याचे झाले आहे. यात लोह्यात हाच प्रकार (ता. २४) मध्यरात्रीच्या एक वाजता घडला. वाळूमाफियाने अवैध वाळूचा ट्रक हायवा घेऊन बेनाळ येथे जात असताना लोहा तहसील कार्यालयातील अवैध वाळू व गौण खनिज प्रतिबंधक पथकाच्या गाडीवर हल्ला करून गाडीच्या काचा फोडल्या. तसेच कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गुरूवारी (ता. २४) मध्यरात्री एकच्या सुमारास तहसीलदाराने नेमलेल्या अवैध गौण खनिज प्रतिबंधक पथकाने अवैधरीत्या उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकातील तलाठी एम .जी. पवार कलंबर बुद्रुक कापशी, तलाठी जी. जे. टेळकीकर, तलाठी एन. सुदगीरवार (कारेगाव), वाहनचालक कृष्ण भगवान मंडोले हे शासकीय वाहन क्रमांक ( एम. एच. २६- बीसी- ५७५१) या शासकीय वाहनाने बेनाळ (ता. लोहा) येथे पोहोचले. हायवा ट्रक क्रमांक (एम. एच. २६- ८८४९) ज्यामध्ये पाच ब्रास वाळू भरलेली होती. 

सात जणांवर गुन्हा दाखल

या वाहनाला पकडून दंडात्मक कारवाई करीत असताना हायवा ट्रक क्रमांक( एम. एस. २६- ८८४९) माझा आहे म्हणून समोर आलेले संतोष व त्याचे चुलत बंधू मारुती वरपडे व इतर पाच जणांनी धक्का बुक्की केली. आम्ही सदर वाळू बाबतीत वैध वाहतूक परवाना आहे का? असे विचारले. त्यांच्याकडे कोणताही वैध वाहतूक वाळू परवाना मिळून आला नाही. त्यामुळे आम्ही सदर वाळूने भरलेला हायवा ट्रक पोलीस स्टेशनवर येथे घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी गाडी मालक संतोष वरपडे व मारुती वरपडे व इतर पाच जणांनी शासकीय वाहनाचे वाहन चालक श्रीकृष्ण मंडोले यांना धक्काबुक्की केली. तसेच पांढऱ्या रंगाची ( टियुव्ही ३००) चार चाकी वाहन अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 

प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला

त्यामुळे प्रसंगावधान ओळखून तलाठी एम. जी .पवार, तलाठी जी. जे., तलाठी सुंदगिरवार व वाहन चालक श्रीकृष्ण मंडोले हे सर्वजण शासकीय वाहनाने पोलीस स्टेशन येथे येत असताना आरोपी संतोष वरपडे, मारुती वरपडे व इतर पाच जणांनी त्यांच्यावर व शासकीय वाहनावर दगडफेक केली. त्यात गाडीच्या काचा फोडून शासकीय वाहनांचे नुकसान झाले. त्यामुळे संतोष वरपडे, मारूती वरपडे व इतर पाच जणांविरोधात तहसीलदार लोहा विठ्ठल परळीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

वाळू माफियांच्या मुसक्या आवळा

लोहा तालुक्यासहीत नांदेड जिल्ह्यात सन  २०१९-२० या वर्षासाठी रेती घाटाचे शासकीय टेंडर सुटले  नसल्यामुळे लोहा तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून पेनुर, अंतेश्वर, भारसावडा, शेवडी, बेटसांगवी  हातणी, येळीसह आदी ठिकाणी वाळू माफियाने लाखो ब्रास रेतीचा अवैध उपसा करून शासनाला करोडो रुपयांचा चुना लावला आहे. शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविला आहे. अनेक ठिकाणी हजारो ब्रास रेतीचा अवैध साठा जमा करून त्याची अवैधरित्या वाळू माफिया हे हायवा ट्रक ट्रॅक्टरद्वारे लोहा व  सोनखेड पोलिस हद्दीतून रात्रंदिवस अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत आहेत. जादा दराने वाळू विकत आहेत. आता त्यांच्यावर विभागीय आयुक्त औरंगाबाद, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड ,जिल्हा अधिकारी नांदेड व जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड या वरिष्ठ अधिकाऱ्याने तात्काळ लक्ष देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी .
मारूती कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, पेनुर (ता. लोहा)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT