file photo 
मराठवाडा

Video : रेल्वेप्रवाशांसाठी ‘सॅनिटायझर’ची व्यवस्था 

गणेश पांडे

परभणी : रेल्वेने प्रवास करून परभणी शहरात येणाऱ्या प्रवाश्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने सॅनिटायझरची व्यवस्था गुरुवारी (ता.१९) करण्यात आली. या उपक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते रेल्वेस्थानकावर करण्यात आले.

‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय योजना आमलात आणल्या जात आहेत. यात वेगवेगळ्या संघटनादेखील मदतीसाठी पुढे येत आहेत. परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने देखील शहरातील रेल्वेस्थानकात उतरणाऱ्या प्रवाश्यासाठी ‘सॅनिटायझर’ची व्यवस्था केली आहे. व्यापाऱ्यांचा हा उपक्रम ता. ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. 

जिल्हाधिकारी मुगळीकर यांच्या हस्ते उदघाटन
या उपक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१९) सकाळी करण्यात आले. या वेळी प्रवास करून स्थानका उतरलेल्या प्रवाश्यांच्या हाताचे सॅनिटाईझेन केले जात आहे. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके, महापालिका आयुक्त रमेश पवार, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्यासह व्यापारी महासंघाचे पदाधिकारी संजय मंत्री, नितीन वट्टमवार, नंदकिशोर अग्रवाल, अशोक माटरा, स्टेशन प्रबंधक देविदास भिसे, अन्न व औषधी प्रशासनाचे मुरेवाड यांची उपस्थिती होती.


सुरक्षिततेसाठी सदैव तप्पर
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सरकार व प्रशासन त्यांच्या स्तरावर योग्य त्या उपाययोजना करत आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. व्यापारीमहासंघ देखील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तप्पर आहे.
- सूर्यकांत हाके, जिल्हाध्यक्ष, व्यापारी महासंघ,परभणी
...

 

 

 

हेही वाचा ...

स्वच्छता कर्मचाऱ्यांना
सॅनिटायझर, मास्कचे वाटप

परभणी : शहर व परिसर स्वच्छ ठेवणारे कर्मचारी सुद्धा आपलीच माणसं. ते नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हेदेखील आपले कर्तव्य समजून नगरसेवक चंद्रकांत शिंदे यांनी त्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले आहे.

हेही वाचा-  लग्नाच्या तारखाही पुढे ढकलल्या...!
परभणी महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी असे कुठलेही साहित्य नाही. गमबूट, मास्क, हॅंडग्लोजअभावीच ते स्वच्छतेची कामे करतात. तर सद्यःस्थितीत कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता त्यांच्या आरोग्याचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे, असे समजून येथील प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक चंद्रकांत शिंदे यांनी प्रभाग समिती ‘क’ च्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रत्येकास एक या प्रमाणे ६० सॅनिटायझरसह प्रत्येक प्रत्येकी पाच मास्क, असे ३०० मास्क वाटप केले.

पॉम्पलेटचेदेखील वाटप
त्याच बरोबर जनजागृती म्हणून प्रभागातील नागरिकांसाठी काळजी करू नका; पण सावध राहा, अशा आशयाच्या पॉम्पलेटचेदेखील वाटप केले जात आहे. त्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची लक्षणे व त्यासाठी घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचादेखील समावेश आहे. जनाई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT