मराठवाडा

जळकोट येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा

जळकोटः तालुका आदर्श तालुका बनविणार असल्याची ग्वाही देत तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी (ता.१२) सांगितले. याप्रसंगी सायंकाळी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. 

मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर श्री. बनसोडे यांचा हा पहिलाच जळकोट दौरा होता. शहरात आगमन होताच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर यांनी त्यांचे अभूतपुर्व स्वागत केले. ढोल-ताशांच्या निनाद, फुलांच्या उधळण व फटाक्यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली. निवडणूकीच्या काळात जो शब्द दिला होता त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल.

औरंगाबाद येथील बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे  जळकोट येथे एमआयडीसीची मागणी केली असून ती पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगीतले. तालुक्यात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगून पाच वर्षात पूर्ण करणार आहे. तालुक्यातील रस्त्यावर तातडीने हॉटमिक्स करु, दोनशे विस केव्ही विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन पुढीस महिन्यात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मन्मथ किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे, जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, पंचायत समिती सभापती बालाजी ताकबिडे, उपसभापती सुनंदा धर्माधिकीरी, रामराव राठोड, पंचायत समिती सदस्य स्वाती केंद्र, नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष रोहिणीताई केंद्रे, नगरपंचायतीचे काँग्रेसचे गटनेते महेश धुळशेट्टे, नगरसेविका सुशीला डांगे, डॉ. चंद्रकांत काळे, डॉ. शितल काळे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, बाबूराव जाधव, धनंजय भ्रमण्णा, गणपतराव धुळशेट्टे, धोंडीराम पाटील, मारुती पांडे, श्री. पवार, सरपंच दिलीप कोकणे, मेहताब बेग, राजू केंद्रे, राजू डांगे, संभाजी कोसबे, मन्मथ बुक्के, दाऊत बिरादार, दत्ता घोणसीकर दयानंद दाडगे, नागनाथ धुळे, मंगेश गोरे, सत्यवान दळवे, विठ्ठल चव्हाण, नरसिंग डांगे, दत्ता पवार, गजाननदळवे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT