file photo 
मराठवाडा

हिंगोलीत उत्तरप्रदेश सरकारच्या हुकूमशाही विरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्त व उत्तरप्रदेश सरकारच्या हुकूमशाही कारभाराच्या विरोधात माजी आमदार डॉ. संतोष टार्फे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोलीत सोमवारी (ता. पाच) सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.     

हाथरस मधील पिडीत मुलगी व त्यांच्या कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज देशभर सत्याग्रह करण्यात आले त्यानुसार आज हिंगोलीत जिल्हा काँग्रेस कमिटीकडून शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेस पदधिकारी व कार्यकर्त्यांनी डोक्यावर काळ्या पट्टया बांधून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करुन सत्याग्रह आंदोलन केले. प्रत्येकांच्या हातात पिडीत मुलगी व तिच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे असे फलक होते. 

अनेकांची होती उपस्थिती

यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते दिलीप देसाई शहराध्यक्ष बापुराव बांगर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, अजगर पटेल, शोभा मोगले, मधुकर जामठीकर, डॉ.राजेश भोसले, नामदेव बुद्रुक, एल.जी घुगे, ध्रुपत पाईकराव, केशव नाईक, विलास गोरे, श्रीराम जाधव, बालाजी पारिसकर, जिल्हा परिषद  सदस्य सतिश पाचपुते, भगवान खंदारे, एस. पी. राठोड, कैलाश साळुंके, पंकज जाधव, सुमेध मुळे, अजगर पटेल, संतोष राजेगोरे, नंदकिशोर कदम राजाराम खराटे, विशाल घुगे आबेदअली जहागीरदार, बंटी नागरे, गजानन कवडे, अशोक बेले, देविदास ससाणे, चंद्रकांत डुकरे, संजय लोमटे आदींची उपस्थिती होती.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT