kurula 1.jpg
kurula 1.jpg 
मराठवाडा

अंगणातील चिवचिवाट होतोय दुर्मिळ

विठ्ठल चिवडे


कुरुळा, (ता.कंधार, जि. नांदेड) ः ‘चिव चिव ये...चारा खा... पाणी पी अन् भुर्रर्र उडून जा...’ ही साद घालाताच अगदी अंगणभर भरगच्च चिमण्यांचा घोळका व्हायचा... आजीबाई नातवंडांच्या घोळक्यात घास भरवत चिऊताईला हाक द्यायची ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’. आता अशी सादही ऐकायला मिळते; पण चिमण्यांचा घोळका आणि चिवचिवाट मात्र आजमितीस ग्रामीण भागातील अंगणात दुर्मिळ झालेला पाहायला मिळतो. ते चित्र वास्तवात उभं करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाप्रती दायित्व व पक्ष्यांप्रती कृतियुक्त जाणीवजागृतीची गरज आजघडीला निर्माण झाली आहे.


ग्रामीण भागही आता शहरीकरणाकडे वळताना दिसतोय
ग्रामीण भाग म्हटलं की कौलारू घरे, हिरवागार शिवार आणि डोलणारी झाडे आणि पक्ष्यांचे थवे, परसात चिमण्यांचा चिवचिवाट असच काहीसं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण मागील दोन दशकांपासून खेड्यांच रूपडं आता पालटताना दिसत आहे. कुरुळ्यासारखा ग्रामीण भागही आता शहरीकरणाकडे वळताना दिसतोय. बदललेल्या घरांच्या बांधकाम पद्धती आणि आधुनिकीकरणाचा फार्स यामुळे चिमण्यांची घरटी घराच्या लगत आता दुर्मिळ होताना दिसत आहेत. तंत्रज्ञानाच्या सहायाने गजबजलेली गावे आणि विरळ होणारी वनराई याचा प्रत्यक्ष परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर होतानाचे दृश्य आहे. वाढता भ्रमणध्वनीचा वापर आणि प्रदूषण यांच्या विळख्यातच चिमण्यांना स्वः अस्तित्वाचा संघर्ष करावा लागतो. 


निसर्गातील अन्नसाखळी संपन्न
कधी पाण्याअभावी, तर कधी उष्माघाताने वा मानवनिर्मित घटना घडामोडींमुळे संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक असलेल्या चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. निसर्ग समतोलाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे, असे मत काही पक्षीप्रेमींकडून व्यक्त होत आहे. ही खंत व्यक्त होताना कधी कधी निव्वळ बोलाचाच भात अशी परिस्थिती होते. त्यासंदर्भात मोजकेच लोक पुढाकार घेतात ही वस्तुस्थिती आहे. पर्यावरण समृद्धतेसाठी निसर्गातील अन्नसाखळी संपन्न असेल तरच समतोल साधला जातो हे नित्याने बोलले जाते. परंतु, त्यासंदर्भात म्हणावी तशी जनजागृती आजमितीस पाहायला मिळत नाही. केवळ फोटोसेशनपुरते काय ते मर्यादित होताना दिसत आहे. 

प्लॅस्टिक कुंड्या लावणार 
पण आजही ग्रामीण भागातील कुरुळा येथील सुतारकाम करणारे नारायण पांचाळ व शेलदरा येथील सर्पमित्र तथा व्यवसायाने पेंटर सिद्धार्थ काळे हे दोन उमदे तरुण व्यवसायातून निसर्ग बांधिलकी आणि भूतदया जपत आहेत. पेंटर काळे मागील तीन वर्षांपासून स्वखर्चाने पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था करीत आहेत, तर पांचाळ गेली दोन वर्षांपासून टाकाऊ प्लायवूडपासून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनवून मोफत देत आहेत. आज जागतिक चिमणी दिनानिमित्त दोघांनीही विविध ठिकाणी जाऊन चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी व निसर्गसंदेश लिखित तृषा भागवण्याकरिता प्लॅस्टिक कुंड्या लावणार असल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

Rishabh Pant Vs Sanju Samson : टी 20 वर्ल्डकपसाठी ऋषभ पंत की संजू सॅमसन कोण आहे टीम इंडियाची पहिली पसंती?

'बजरंगी भाईजान' मधील मुन्नीने केली ट्रोलर्सची बोलती बंद ; दहावीला मिळाले इतके गुण

Modi Rally in Kalyan: पहिल्या 100 दिवसांच्या व्हिजनमध्ये 25 दिवस वाढवणार; मोदींनी केलं तरुणांना आवाहन

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT