Jalna Schools News 
मराठवाडा

जालना जिल्ह्यातील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद, दहावी व बारावी वगळता इतर वर्ग ऑनलाइन

सुहास सदाव्रते

जालना : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता पाचवी ते नववी वर्गासह निवासी शाळा ता.३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मंगळवारी (ता.२३) सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यात चार दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी  बिनवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागातील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती.

जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करता पुढील मार्च महिन्यातील ता.३१ पर्यंत पाचवी ते नववीचे वर्ग बंद करण्यात यावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दहावी बारावीच्या परीक्षा तारखा राज्य मंडळाने जाहीर केल्या आहेत. यामुळे सदर वर्ग प्रत्यक्ष सुरुच राहणार आहेत. जिल्ह्यातील निवासी शाळा बंद करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. इयत्ता पाचवी ते नववीचे वर्ग ऑनलाइन घेण्यात यावेत असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पाचवी ते नववीचे वर्ग बंद करण्यात येणार असले तरी शिक्षकांना मात्र कर्तव्यावर हजर राहावे लागेल असेही शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. शहरात कोरोना संसर्गजन्य परिस्थिती गंभीर बनत असल्याने शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थी खबरदारी व उपाययोजना करणे कठीण जात असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. दरम्यान पाचवी ते नववीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शहरातील शाळांचा ताण काहीसा कमी झाला असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.


आज जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. बैठकीत विविध सूचना देत जिल्ह्यातील दहावी व बारावी वर्ग वगळता इतर वर्ग ता.३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात यावेत, अशा सूचना बैठकीत दिल्या आहेत.

- आशा गरुड, शिक्षणाधिकारी, जालना

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT