फोटो
फोटो 
मराठवाडा

Science Day : स्टार अकॅडमीच्या विद्यार्थ्यांकडून प्रयोग

प्रल्हाद कांबळे

नांदेड  : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करून त्यांना प्रयोगाकडे वळविण्यासाठी प्रा. श्रीनिवास आचमारे हे सतत प्रयत्न करतात. तो विषयसुद्धा अतिशय सोप्या भाषेत ते शिकवतात. त्यांच्या या मार्गदर्शनाखाली सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी विविध समाजहिताचे प्रयोग सादर केले. त्या प्रयोगाची सविस्तर माहिती देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी स्टार कॅडमीचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. यावेळी प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रा. आचमारे यांनी कौतुक करून शुक्षेच्छा दिल्या.

ता. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकवादी चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये "राष्ट्रीय विज्ञान दिन" म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.

अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या

काही दिवसांपूर्वी भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. २१ वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आहे. नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते.

आपण विज्ञानावर एवढे अवलंबून आहोत

आता आपण विज्ञानावर एवढे अवलंबून आहोत की, आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ हे सुद्धा एक विज्ञानाच्या प्रगतीचे छान उदाहरणच आहे. आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीनमुळे योग्य वेळेत पूर्ण करतो आणि त्याचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे.

विज्ञानामधील चांगले वाईट अनुभव

१९९९ पासून भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबविल्या जातात. यामुळे नवनवीन विषय तसेच विज्ञानामधील चांगले वाईट अनुभव किंवा पुढील काही वर्षाचे नियोजन आपण आतापासून करू शकतो आणि पुढील काळातील होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करू शकतो. १९९९ मध्ये आपले "विश्व बदलणे" ही संकल्पना, २००४ मध्ये समुदायातील "उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती" ही संकल्पना तर २०१३ मध्ये "मॉडिफाईड पिके व अन्नसुरक्षा सुधारणा" या संकल्पनेवर भर देण्यात आला. 

स्टार अकॅडमीचा स्टाफ

स्टार अकॅडमीचे संचालक प्रा. श्रीनिवास आचमारे, प्रा. शिवदास आचमारे, अनिता बिरादार, श्रीमती पांडे, प्रा. शरद बेंद्रे, प्रा. धाराशीव शिराळे यांची उपस्थिती होती.  

या विद्यार्थ्यांनी केले प्रयोग सादर

संस्कार पारसकर (वर्ग सातवा)- आधूनिक शहर, शिवम येवतीकर- सौर उर्जा प्रकल्प, साक्षी पावडे - पाणी वाचवा, योगेश पांडागळे (वर्ग आठवा) - जल पुनर्भरण, शुभम शिंदे - किडनीचे कार्य कसे चालते आणि शिवम शिंदे - ज्वालामुखी असे प्रयोग सादर केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT