photo  
मराठवाडा

‘चंद्रलोक’ मध्ये मात्तबरांचे गुप्तगू ! 

नवनाथ येवले

नांदेड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीला अवघे काही तास उरल्याने महाविकास आघाडीतील पक्षश्रेष्ठींच्या मॅरेथॉन बैठका सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीतील घटकपक्षांना जिल्हा परिषदच्या सत्तेत स्थान देण्याचे जाहीर केल्यानुसार पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता.२०) जानेवारीला हॉटेल चंद्रलोक मध्ये घटकपक्षांच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी खासगीत संवाद साधला. 

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांना सोबत घेवून सत्तास्थापन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या पक्षीय बलाबलाची चाचपणी पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी सोमवारी (ता.२०) हॉटेल चंद्रलोक येथे बैठकीमध्ये केली. शिवसेनेचे हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, आमदार अमर राजुरकर, माधवराव जवळगांवकर पाटील, मोहन हंबर्डे, शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार डि.पी. सावंत, वसंतराव चव्हाण, हणमंतराव बेटमोगरेकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदिप नाईक, शंकर अण्णा धोंडगे, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर आदींसह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.  

बंद दाराआड खलबते 
संख्याबळानुसार काँग्रेसकडून अध्यक्षासह उपाध्यक्ष पदावर दावा करण्यात आल्याने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या गोटातील असंतोषाची दखल घेत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदिप नाईक यांच्याशी बंद दाराआड संवाद साधला. 

मी पडलो, तरी सत्ता आपलीच 
विधानसभा निवडणूकीत माझा पराभव झाला असला तरी राज्याला आपलेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हण लाभले याचा आनंद आहे. राष्ट्रवादीचे संख्याबळ कायम असून जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी ग्राह्य धरण्यात यावे, आगामी काळातील निवडणूका महाविकास आघाडीच्या छत्रछायेत एकत्रीत लढविण्यात येतील 
-प्रदिप नाईक, माजी आमदार, राष्ट्रवादी.  

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद 
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेचे हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार सुभाष साबणे यांच्याशी स्वंतत्र बैठकीद्वारे संवाद साधत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसह विषय समिती विषयी चर्चा केली. 

संख्याबळाची आघाडी
जिल्हा परिषदेच्या एकून ६३ जागांपैकी सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे २८, शिवसेना सहा, राष्ट्रवादी सहा, अपक्ष एक, रासप एक व अन्य एक असे एकूण ४३ एवढे संख्याबळ असल्याचे पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत जाहीर केले. त्याचबरोर काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या दावेदार चार महिला सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. 

अंतिम निर्णय लवकरच 
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदांसाठी दावेदारांच्या घोषणे बाबत पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी कमालीची गुप्तता पाळत काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी सदस्यांना विश्वासात घेवून लवकरच उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT