औरंगाबाद - बुधवारी रात्री सुरक्षारक्षकाचा खून झालेली शेंद्रा येथील औद्योगिक वसाहतीतील कंपनी.
औरंगाबाद - बुधवारी रात्री सुरक्षारक्षकाचा खून झालेली शेंद्रा येथील औद्योगिक वसाहतीतील कंपनी. 
मराठवाडा

शेंद्रा येथे कंपनीत सुरक्षारक्षकाचा खून

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - कंपनी मालकीच्या वादातून शेंद्रा औद्योगिक वसाहतीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात सुरक्षारक्षकाला चाकूने भोसकल्याने त्याचा मृत्यू झाला. याच घटनेत दोन्ही गटांतील चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. एक) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. यात चौघांना पोलिसांनी अटक केली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, रिझवान खान रशीद खान (वय ३६, रा. उस्मानपुरा) असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तो कंपनीत दहा वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. मेहराज खान रशीद खान (वय २७), आवेश खान दोस्त मोहंमद खान, आदिल खान नसीर खान, खालेद अब्दुल तुराब (वय ३९, रा. नवाबपुरा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत नूर इंटरप्राईजेस ही कंपनी आहे. या कंपनीत आधी जनावरांची कत्तल केली जात होती; परंतु २०१४ पासून कत्तल बंद आहे. या कंपनीच्या जागेच्या मालकीवरून अब्दुल गणी कुरेशी व खालीद अबू तुराब यांच्यात वाद आहेत. यातून बुधवारी रात्री नूर इंटरप्राईजेस कंपनीत कारमधून सशस्त्र पाच ते सहाजण आले. त्यावेळी कंपनीच्या गेटवर ड्युटीवर असलेल्या रिझवान खान याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी दहशत माजवून गोंधळ घातला.

यानंतर उभयतांमध्ये हाणामाऱ्या झाल्या. रिझवान खान व त्याचा भाऊ मेहराज खान धावल्यानंतर खालीद अबू तुराब, शेख अब्दुल माजीद शेख अब्दुल हमीद, आवेज खान दोस्त मोहंमद खान, आदिल खान नसीर खान, कैसर कुरेशी यांनी दोघा भावांवर शस्त्राने वार केले. यात रिझवान खान याचा मृत्यू झाला; तर त्याचा भाऊ मेहराज खान व इतर गंभीर जखमी झाले. घटनास्थळी रक्‍ताचा सडा पडला होता.

खून, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
कंपनीतील धुडगुसामुळे लगतच्या कंपनीतील सुरक्षारक्षकांनी चिकलठाणा पोलिसांना घटनेची माहिती दिली. तत्पूर्वी काहीजण पसार झाले; तर जखमींना नागरिक व पोलिसांच्या मदतीने घाटी रुग्णालयात दाखल केले. रिझवान खान यांच्या मृत्युप्रकरणी खून तसेच खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

चौघांना अटक
खालेद अब्दुल तुराब व शेख अब्दुल माजेद शेख, आवेश खान दोस्त मोहंमद खान, आदिल खान नसीर खान यांना चिकलठाणा पोलिसांनी अटक केली, अशी माहिती सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली. तत्पूर्वी मारेकऱ्यांना अटकेनंतरच रिझवानचा मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT