file photo
file photo 
मराठवाडा

खळबळजनक घटना : सततचा लॉकडाऊन, संचारबंदीमुळे जिंतूरात तरुण व्यापाऱ्याची आत्महत्या

राजाभाऊ नगरकर

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : सततचा लॉकडाऊन व संचारबंदीमुळे वर्षापासून व्यवसाय बंद, आर्थिक संकटाच्या चक्रव्यूहात साप[लेल्या एका तरुण व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. एक एप्रिल) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. नारायण सदाशिव डोईफोडे (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

शहरातील सटवाईमाता मंदिर परिसरातील रहिवाशी असलेले नारायण डोईफोडे हे खेडोपाडी फिरुन तसेच ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात कापड विक्रीचा व्यवसाय करुन प्रपंचाचा गाडा हाकत असत. व्यवसायासाठी त्यांनी वेगवेगळ्या वित्तीय संस्थां, खाजगी गट व मित्रांकडून मिळून दहा लाख रुपये कर्ज  व उसनवारी घेतले. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून सतत होत असलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे व्यवसायाला खीळ बसली. त्यामुळे कुटुंबातील वयोवृद्ध वडील, एक दिव्यांग बहिण, पत्नी, दोन मुले यांच्या उदरनिर्वाहाच्या व कर्जफेडीच्या प्रश्नामुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले होते. या विवंचनेतच त्यांनी टोकाचे पाऊल उचलून घरात छताला दोर बांधून गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

आर्थिक मदतीची मागणी 

दरम्यान नारायण यांचा मृतदेह उत्तरक्रियेसाठी नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात आणला. परंतु नारायण यांच्या आत्महत्येमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आल्याने यावेळी नातेवाईकांनी प्रशासनाकडे आर्थिक मदत देण्याची मागणी केली. व जोपर्यत मदत दिली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. एव्हाना नागरिकही मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासन व मुख्यमंत्री यांना प्रस्ताव पाठविण्याबद्दल विश्वास दिला असता वातावरण शांत झाले.

पोलिसांनीही मारहाण केली होती 

लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील बाजार बंद झाल्यामुळे नारायण यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या गल्लीतच भाजीपाला विक्रीसाठी गाडा लावून व्यवसाय करत असताना बुधवारी (३१ मार्च) पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरुन त्यांना जबर मारहाण केली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

आतातरी लॉकडाऊन शिथिल करावे 

यावेळी नायब तहसीलदार परेश चौधरी, मंडळ अधिकारी प्रशांत राखे, नागेश देशमुख तसेच परीक्षाविधीन उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. दडस यांनी रुग्णालयात भेट दिली असता आतातरी प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी उपस्थित व्यापारी व नागरिकांनी केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: फ्रेझर-मॅकगर्कचे चौकार-षटकारांची बरसात करत तुफानी अर्धशतक; दिल्लीला मिळाली दमदार सुरुवात

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

SCROLL FOR NEXT