वसमत क्राईम न्यूज 
मराठवाडा

देशभरातील तरुणांना फसवणारा मास्टरमाईंड शैलेश दुबे वसमत पोलिसांच्या जाळ्यात

देशातील शेकडो सुशिक्षित बेकार तरुणांना नौकरीचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती चौकशीत समोर येत आहे.

संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : नोकरीचे आमिष दाखवून शेकडो सुशिक्षित बेकार तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून कोट्यावधी रुपयांची लुट करणाऱ्या व टोळीचा मास्टर माईंड असलेल्या शैलेश दुबे याला आंध्र प्रदेशातील कर्नूल येथून गुरुवारी ( ता. २४ ) रात्री वसमत पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी देशभरातील विविध ठिकाणाहून सात आरोपी वसमत पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले आहेत. शैलेश दुबेला शनिवारी (ता. २६) वसमत न्यायालयासमोर हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत माहिती अशी की, २०२१ रोजी पंडीत ढवळे यांनी वसमत शहर पोलिस ठाण्यात नौकरीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. त्यावरुन वसमत शहर पोलिस व स्थानिक गुन्हा शाखा हिंगोली यांच्या वतीने पथक स्थापन करुन आरोपींचा शोध सुरु केला होता. त्यानंतर याप्रकरणात देशातील विविध ठिकाणाहून संतोषकुमार सरोज बनवारीलाल सरोज रा. बोडेपुर ता. मच्छलीसहर जि. जौनपुर, उत्तरप्रदेश, अभय मेघश्याम रेडकर रा. सिरोडा ता. वेंगुर्डे जि. सिंधुदूर्ग, रविंद्र दयानिधी संकुआ रा. काटेमानेवली ता. कल्यान जि. ठाणे, नरेंद्र विष्णूदेव प्रसाद रा. लैरुपेरुवार ता. कोपागेज जि. मऊ, सतीश तुळशीराम हंकारे रा. बोरगाव ता. लोहा जि. नांदेड, गौतम एकनाथ फणसे रा. वागणी ता. अंबरनाथ जि. ठाणे व आनंद पांडुरंग कांबळे रा.अहमदपुर जि. लातूर या सात जणांना दिल्ली, मुंबई अशा मोठ्या शहरांतून ताब्यात घेऊन अटक केली होती.

हेही वाचा - विधायक बातमी : पालावरच्या 650 कुटुंबातील महिलांचे चेहरे खुलले

या आरोपींनी देशातील शेकडो सुशिक्षित बेकार तरुणांना नौकरीचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती चौकशीत समोर येत आहे. परंतू या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड शैलेश दुबे हा आंध्र प्रदेशातील हैद्राबादला असल्याची माहिती वसमत पोलिस व स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. बोधनापोड, पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, श्री. बरगे, सुनिल गोरलावाड, रवि ढेंबरे, श्री गुंडरे, श्री. वडगावे, स्थानिक गुन्हा शाखेचे श्री.काळे, श्री. काटकाडे आदींच्या पथकाने आंध्रप्रदेशातील कर्नूल येथून शैलेश दुबे याला अटक करुन वसमतला आणले. मोठा मासा पोलीसांच्या हाती लागल्याने आता फसवणूक प्रकरणात अनेक सुत्रधारांची नावे समोर येतील. दरम्यान नौकरीचे आमिष दाखवुन कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या टोळीचा वसमत पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील फसवणुक झालेले तरुण वसमत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येत असल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT