file photo 
मराठवाडा

गरजूंसाठी शालीमार समूह आला धावून 

कैलास चव्हाण

परभणी : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन झाले आहे. या परिस्थितीमध्ये अनेक गरिबांचे घरी आज कामाला गेले तरच उद्या चूल पेटते, अशी विदारक परिस्थिती असल्याचे भान ठेवत शालीमार समूहाचे संस्थापक  हमीद खान यांनी ७०० कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंची एक किट तयार केली आहे.

‘कोरोना’ला आटोक्यात आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. त्याचा एक भाग म्हणून देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे मजूर, कामगार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा आहे. अनेक कुटुंबांना आपल्या गावाकडेदेखील जात आले नसल्याने ते शहरात वास्तव्यास आहेत. मात्र, त्यांची उपासमार होऊ लागल्याने परभणी शहरातील अनेक संस्था, दाते पुढे आले आहेत. परभणी शहरात सकाळी आणि दुपारी फिरून रस्त्यावरील बेघरांसाठी अन्न व पाणी पुरवत आहेत. तसेच अनेकांनी पुढाकार घेत गोरगरीब जनतेसाठी किराणा साहित्य पुरविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात शालीमार समूहाने पुढाकार घेतला आहे. मागील चार दिवसांत समूहाने जीवनावश्यक वस्तूंच्या किट तयार करून रविवारी (ता. २९) गरजूंना वाटप केल्या आहेत.

जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप
जीवनावश्यक वस्तूंचे ७०० कुटुबांतील तीन हजार ५०० व्यक्तींना १५ दिवस पुरेल एवढे जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या उपस्थित शालीमार ग्रुपचे संस्थापक शेख हमीद यांनी केले. यामध्ये  पाच किलो तांदूळ, साडेसात किलो गहू, तेल एक किलो , दोन किलो दाळ, साखर दीड किलो, चहापत्ती २५० ग्रॅम, हळदी पावडर १०० ग्रॅम, मिरची पावडर २५० ग्रॅम, मीठ एक किलो, कपडे धुण्यासाठी साबण एक नग, आंघोळीसाठी डेटॉल साबण दोन नग देण्यात आले. या वेळी गोरगरीब व गरजू लोकांनी जिल्हाधिकारी  मुगळीकर व शेख हमीद यांचे ऋण व्यक्त केले.


सेवाभावी संस्थांना आवाहन
‘कोरोना’च्या  परिस्थितीमुळे जिल्ह्यासह इतर राज्यातील एकही व्यक्ती, मजूर, हमाल, रोजंदारी  कर्मचारी उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सेवाभावी संस्थांना केले आहे. ‘कोरोना’च्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी  श्री. मुगळीकर यांनी जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांची आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळिक , निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, डॉ. संजय कुंडेटकर, महापालिका सहायक आयुक्त अल्केश देशमुख, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिस्थितीमध्ये परराज्यातील कामगार व जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, यासाठी विविध सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन सर्व गरजूंना जीवनावश्यक वस्तू व अन्न उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी आवाहन केले. तसेच विविध सेवाभावी संस्थेकडून व नागरिकांकडून मदत स्वीकारणे व वितरण करणे व त्यांच्यात समन्वय साधणे आदींसाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Kolhapur Wildlife Attack : अवघ्या सव्वा वर्षांच बाळ वडिलांच्या कुशीत शांत झोपलं अन् कोल्ह्याने बरोबर हेरलं; कोल्हापूरच्या चंदगडमध्ये घडलं भयानक

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प

Nagpur Gas Cylinder Price: धुराचे लोट; गॅस टंचाईमुळे गृहिणी पुन्हा चुलीकडे! सरपण गोळा करण्यासाठी महिलांची वणवण

SCROLL FOR NEXT