nanded photo 
मराठवाडा

परीक्षा संपेपर्यंत तिला या दुःखाची कल्पनाच नव्हती...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : घरातील कर्ता व्यक्ती आजारी असलेत तर, त्याचा सर्व भार त्या घरातील महिलेच्या खाद्यावर येतो. परंतू घरातील महिला आजारी असले तेव्हा मात्र, घरची सर्व जवाबादारी घरातील जाणत्या मुलीवर येऊन पडते. दहावीची परीक्षा सुरु झाली तेव्हापासून दिप्ती लोखंडेच्या बाबातीत घडले. तिची आई रुग्णालयात असल्याने आईची काळजी, वडीलांचा डब्बा, घरचे सर्व कामे करुन परीक्षा देणे सुरु होते. परंतु शनिवारी (ता.सात) दुपारी दहावीची परीक्षेला देऊन हसत घरी आलेल्या दिप्तीवर आई गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला.

शाकुंतल शाळेची विद्यार्थीनी असलेली दिप्ती तीन मार्चपासून दहावीची परीक्षा देत आहे. शनिवारी सकाळी ११ ते दोन या वेळेत दिप्तीचा द्वितीय भाषा विषयाचा पेपर होता. एकीकडे आईची रुग्णालयात मृत्युशी झुंज तर दुसरीकडे दिप्तीची माणिकनगर येथील शिवाजी हायस्कुल परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होती. विशेष म्हणजे दिप्तीचे वडील भास्कर लोखंडे हे देखील आर्धापूर ताक्यातील शाळेवर शिक्षक आहेत.
अशा कठिण प्रसंगास दिप्ती मोठ्या धाडसाने घर आवरुन परीक्षा देत आहे. अशा स्थितीत तिच्या चेहऱ्यावर कुठलाही तनाव जानवत नव्हता. दिप्तीची परीक्षा सुरु झाल्यापासून आईची प्रकृती बिघडली आहे. आईला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

पेपर सुटण्यापूर्वीच आईच्या ह्रदयाचे ठोके थांबले
आई लवकरच बरी होऊन घरी येईल या आशेनी दिप्ती मोठ्या धिराने परीक्षेला सामोरे जात होती. शनिवारी पेपर झाल्याने ती पुन्हा आईला भेटण्यासाठी रुगणालयात जाणार होती. द्वितीय भाषा विषयाचा वेळे अधिच पेपर देऊन ती शेवटचा टोल कधी होतो. आणि आईला कधी जाऊन भेटु असा आईचा विचार करत बसली होती. परीक्षेचा टोल पडण्यापूर्वीच तिच्या आईच्या ह्रदयाचा शेवटचा ठोका पडला. आनंदाच्या क्षणावर विर्जन घालणारी बातमी तिच्या परीक्षा केंद्राच्या बाहेर येऊन थांबली होती.

परीक्षा संपताच लालगी होती आईची ओढ
परीक्षा केंद्राबाहेर दिप्तीचा मावस भाऊ काळजावर दगड ठेवून दिप्तीला घेण्यासाठी हजर झाला होता. इथपर्यंत दिप्तीला काहीच माहित नव्हते. नेहमी प्रमाणे ती हसत परीक्षा केंद्राबाहेर आली. भावाने पेपर कसा गेला, तुला भुक लागली असेल आपन जेवण करु अशी अर्जव दिप्तीला केली. परंतू मला भुक नाही लागली म्हणत तिनी घराकडे चलण्याचा आग्रह धरला. हसत घरापर्यंत आलेल्या दिप्तीला घरी जमलेल्या धिर गंभीर वातावरणावरुन आंदाज बांधता आला नाही. परंतू आई देह सोडून गेल्याचे कळल्याने मात्र इतक्या दिवसापासून मोठ्या धिटाईने परीक्षा देऊन येणाऱ्या सावित्रीच्या लेकीला महिलादिनाच्या पूर्व संध्येला अश्रुंचा बांध आवरता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT