शिंदे समिती जालन्यात दाखल Esakal
मराठवाडा

Maratha Reservation : शिंदे समिती जालन्यात दाखल; नागरिकांकडून मराठा आरक्षणासाठी घेणार पुरावे

समितीकडून नागरिकांकडे असलेले मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीचे पुरावे दुपारी स्विकारले जाणार

उमेश वाघमारे

जालना : मराठा आरक्षणासाठी गठित केलेले निवृत्त न्यायमुर्ती शिंदे समिती गुरूवारी (ता.१२) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली असून अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. दरम्यान या समितीकडून नागरिकांकडे असलेले मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदीचे पुरावे दुपारी स्विकारले जाणार आहेत.

मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दती विहीत करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गाठीत करण्यात आली आहे. ही समिती मागील दोन दिवसांपासुन मराठवाड्याच्या दौरा आहे. गुरुवारी (ता.१२)ही समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे व इतर सदस्य जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत.

सध्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे व सदस्य यांची स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे. ही बैठक संपल्यानंतर दुपारी दुपारी दोन ते चार यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांकडून मराठा आरक्षण मागणीचे पुरावे स्विकारतील जाणार आहेत.

दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा नोंदी असलेले सुमारे अडीच हजार नोंदी आढळुन आल्या आहेत. १९४० ते १९६७ या दरम्यानच्या काळातील तब्बल १७ ते १८ लाख दस्त तपासणी पूर्ण झाली असून या तपासणी दरम्यान या नोंदी मिळल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : लव्हस्टोरीतून एमपीएससीचा पेपर फुटला; प्रेमासाठी पेपर फोडल्याने यंत्रणा हडबडून जागी, असं काय घडलं?

गोड साखरेचा कडू इतिहास! युरोपातील राजे-महाराजे 'या' खास कारणासाठी करायचे साखरेचा वापर

कुकू कोहलींच्या अंत्ययात्रेत लेकीनं दिला खांदा; वडिलांना अखेरचा निरोप देताना करिश्मा कोहली भावूक

Panchganga Pollution: ‘एसटीपी’ उभारणीच्या दिरंगाईचा अहवाल द्या; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंचे आदेश; कोल्हापुरात येऊन पाहणी करणार

वैभव सूर्यवंशीच्या टेस्ट ड्रीमला मोठा धक्का? राहुल द्रविड यांनी सांगितली मोठी अडचण; म्हणाले, ‘अजून बराच पल्ला गाठायचा आहे’

SCROLL FOR NEXT