0Vinayak_20Mete_20wants_20ticket_20for_20assembly_20elections_20from_20mahayuti.jpg 
मराठवाडा

आरक्षणासाठीच्या मशाल मार्चला पाठिंबा, सरकार मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावतेय : विनायक मेटे

दत्ता देशमुख

बीड : सात नोव्हेंबरला बांद्रा ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर धडकणाऱ्या मशाल मार्चला शिवसंग्रामचा पाठिंबा असून शिवसंग्रामही यात सहभागी होणार असल्याची माहिती, शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिली. ‘मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज’ यांच्या वतीने निघणाऱ्या या मशाल मार्चमध्ये सर्वच आमदार खासदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री.मेटे यांनी केले. हा प्रश्न केवळ मराठा आरक्षण नाही तर समाजातील मोठ्या घटकाचा आहे, असे ही ते शनिवारी (ता. ३१) पत्रकार परिषदेत म्हणाले. विद्यार्थी परिषदेचे अशोक सुखवसे, ॲड. शशिकांत सावंत, अॅड. शेळके,  बबन शिंदे, ॲड. दोडके, मुकुंद गोरे उपस्थित होते.     


मशाल मार्च हा राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या हलगर्जीपणाच्या धोरणाविरुद्ध आहे. मंत्रिमंडळातील सदस्य बेजबाबदारपणे बोलत आहेत. मराठा आरक्षण उपसमितीची अध्यक्ष अशोक चव्हाण हलगर्जीपणाने वागत आहेत. चव्हाणांना पदावरून हटवून योग्य व्यक्तीची निवड करावी, अशी मागणीही श्री.मेटे यांनी केली. समाजाला न्याय देण्यासाठी योग्य धोरण आखावे. मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य केली नाही तर राज्यपालांना भेटणार असल्याचेही ते म्हणाले.

घटनात्मक पद्धतीने राज्यकारभार चालावा यावर देखरेख करण्याची जबाबदारी राज्यपालांचीच असते. त्यासाठीच हे पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, पाच नोव्हेंबरला बीडमध्ये मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषदेचे होणार आहे. जिल्ह्यातील मराठा समाजातील अभ्यासू युवकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
युवक - विद्यार्थ्यांना आरक्षणसंबंधी मार्गदर्शन, योग्य कायदेशीर माहिती मिळावी, आरक्षण लढ्यासाठी आवश्यक या परिषदेच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचेही विनायक मेटे यांनी सांगितले.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT