फोटो 
मराठवाडा

आंध्र आणि तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांना शिवसेनेकडून मदत

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शिक्षणासाठी आलेल्या आंध्र व तामिळनाडू राज्यातील अनेक विद्यार्थी शहराच्या विविध भागा अडकून पडले आहेत. त्यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्यावतीने खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती. 

कोरोना या जीवघेण्या आजारावर मात करण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कठोर पाऊले उचलत आहेत. संबंध देशभर लॉकडाऊन व जिल्हा सिमा बंद केल्याने अनेक बाहेर राज्यातील किंवा जिल्‍ह्यातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने अडकून पडले आहेत. त्यांच्यावर उपसामारीची वेळ येऊ नये म्हणून विविध सामाजीक संस्था पुढे आल्या आहेत. त्यात शिवसेनाही मागे नाही. 

आसना बायपास येथेही धान्य वाटप

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी आसना बायपास येथील त्यांच्या संपर्क कार्यालयातून सांगवी, गौत्तमनगर, माळटेकडी, आंबानगर आदी भागातील गोरगरीबांना धान्य वाटप करण्यात आले. तसेच काही नागरिकांना त्यांनी मास्कचे सुद्धा वाटप केले. तसेच नागरिकांनी आपल्या घरातून बाहेर पडु नये असे आवाहन करत आहेत. उपशहरप्रमुख रमेश पाटील कोकाटे यांनीही प्रत्यक्ष प्रभाग क्रमांक तीनमध्ये फिरून नागरिकांना घराबाहेर पडू नका, कोरोनासारखे मोठे संकट आहे त्यावर आपणास मात करावयाची आहे असे आवाहन केले.  

शिवेसनेचे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण

यासोबतच ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणाला अनुसरुन शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी तरोडा बु. व खु. परिसरात अडकलेल्या अनेक विद्यार्थी व रोजगाराना खिचडीचे वाटप करण्यात आले. ते मागील तीन दिवसांपासून हे कार्य करत आहेत. त्यांच्यासमवेत आमदार बालाजी कल्याणकर हे सुद्धा सोबत आहेत. तसेच राजू यादव, शशिकांत कलाने यांचीही ते मदत घेत गरजु लोकांपर्यंl पोहचत आहेत.

येथे क्लिक कराबायकोचा पाठलाग करणाऱ्यावर टाकले पेट्रोल अन्...
  
आमदार बालाजी कल्याणकरांची पुढाकार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचना घेऊन आमदार बालाजी कल्याणकर हे आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रशासनाकडून सोडवून घेत आहेत. तसेच प्रशासनाला ते वेळोवेळी सुचना करुन मार्गदर्शन करत आहेत. शहरातील अनेक भागात ते स्वत: जावून गरीब व रोजमजुरांना धान्य व अत्यावश्‍यक सेवा पुरवित आहेत. प्रत्यक्ष ते दोन्ही हात जोडून नागरिकांना महत्वाच्या कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला देत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT