hingoli photo 
मराठवाडा

शिवसेनेचे खासदार, आमदार पोचले बांधावर

संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे डोंगरकडा परिसरातील केळी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी (ता.१२) आमदार संतोष बांगर यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या समवेत या भागांना भेटी देऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. तसेच खासदार हेमंत पाटील यांनीही शेवाळा परिसरात भेटी देत शेतकऱ्यांना आधार दिला

दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे तालुक्यातील बागायती व फळ उत्पादक शेतीला मोठा फटका बसला आहे. डोंगरकडा परिसरातील दिग्रस खुर्द, सालापूर, दांडेगाव या भागामधील केळी व ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले. 

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे व ऊस संपूर्ण आडवा पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही परिस्थिती पाहता आमदार संतोष बांगर यांनी तालुका कृषी अधिकारी गजानंद पवार यांच्यासोबत या भागांना भेटी देऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.

पंचनाम्याचा अहवाल तातडीने सादर करा

तातडीने पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत पंचनाम्याचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या वेळी तालुका कृषी अधिकारी गजानंद पवार, सभापती फकीरराव मुंडे, राजेंद्र शिखरे, रामभाऊ कदम, नारायण साळवे, रावसाहेब सोळंके, बालाजी गोरे, कृषी सहायक श्री. पंडित, तलाठी, श्री. गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

खासदार हेमंत पाटील यांच्याकडून पाहणी

शेवाळा : कळमनुरी तालुक्‍यातील कान्हेगाव, पिंपरी खुर्द व परिसरात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पाहणी शुक्रवारी (ता. १२) खासदार हेमंत पाटील यांनी केली. कान्हेगाव, पिंपरी खुर्द व परिसरातील अनेक गावांत बुधवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे येथे अनेकाच्या घरांवरील तसेच शाळेवरील टीनपत्रे उडून गेली. 

विविध गावांना भेटी

शेतशिवारातील आखाड्यांवरदेखील नुकसान झाले. त्‍याची पाहणी करण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी शुक्रवारी या गावांत भेट दिली. या वेळी आमदार संतोष बांगर, पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपू पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील काळे, नगरसेवक रामभाऊ काळे, सरपंच दादाराव पाटील, दिलीपराव माने, श्रीकांत वाघमारे, पंजाब दुर्गे, गजानन वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT