Arjun Khotkar_ShivSena MLA 
मराठवाडा

खोतकरांचा शिंदे गटाला पाठींबा जाहीर; उद्धव ठाकरेंची साथ सोडताना अश्रू अनावर

उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मी समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

जालना : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी अखेर एकनाथ शिंदे गटाला पाठींबा जाहीर केला. पत्रकार परिषदेतून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. यावेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. खोतकर शिंदेंना पाठिंबा देणार असल्याची गेल्याकाही दिवसांपासून चर्चा सुरु होती. (ShivSena MLA Arjun Khotkar support for Shinde Group of ShivSena)

पत्रकार परिषदेत खोतकर म्हणाले, आज सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी माझं सविस्तर बोलणं झालं. माझ्यावर ओढवेलली माहिती मी पक्षप्रमुखांना सांगितली. त्यानंतर मी संजय राऊतांशी बोललो. जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी बोललो. मी ४० वर्षांचा सच्चा शिवसैनिक आहे. कुटुंबियांसाठी मला काही निर्णय करणं गरजेचं आहे, असं सांगताना मी उद्धव ठाकरेंची परवानगी मागितली. त्यानंतर मी आज शिवसैनिकांच्या साक्षीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षप्रमुख म्हणून सहकाऱ्यांना सुरक्षित करणं गरजेचं

पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना आपल्या सहकाऱ्यांना सुरक्षित करणं गरजेचं आहे. मला असं निश्चित वाटतं की, त्यांच्या निर्णयाच्या माध्यमातून त्यांनी मला सुरक्षित केलं असेल. उद्धव ठाकरे मला म्हणाले की, तुम्ही अडचणीत असाल तर निर्णय घेऊ शकता. माझ्यासमोर अडचण कोणी निर्माण केली हे सांगायची गरज नाही. हे सर्वांना माहिती आहे, असंही खोतकर म्हणाले.

माझ्यावरील चौकशीचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळं मला त्यावर बोलायचं नाही. पण ज्या संविधानिक संस्था आहेत त्यांना चौकशीचे अधिकार आहेत. पण यामध्ये माझं संपूर्ण कुटुंबाची परवड होत आहे. त्यामुळं तुम्हाला काय अर्थ लावायचा तो लावा पण मी आता एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. अडचणीतला माणूस सहारा शोधत असतो ना, असंही यावेळी अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT