crpf khandare 
मराठवाडा

धक्कादायक बातमी : पिंपळखुटा येथे सीआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

तालुक्यातील पिंपळखुटा येथे केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने (सीआरपीएफ) शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. तीन) दुपारी एक वाजता घडली आहे.

राजेश दार्वेकर

हिंगोली : तालुक्यातील पिंपळखुटा येथे केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने (सीआरपीएफ) शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. तीन) दुपारी एक वाजता घडली आहे. संजय योगाजी खंदारे (वय २८) असे या जवानाचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा येथील संजय योगाजी खंदारे हे मागील तीन ते चार वर्षापुर्वी केंद्रीय राखीव दलामध्ये रुजू झाले होते. सध्या ते जम्मू काश्मीर भागातील कुपवाडा येथे कर्तव्यावर होते. मागील काही दिवसांपुर्वीच एक महिन्याच्या सुट्टीवर आले होते.

हेही वाचा - शेजाऱ्याबरोबर भांडण झाल्याने रागाच्या भरात दोन मजली इमारतीच्या गच्चीवर जाऊन महिलेने दोन मुलांना खाली फेकून स्वतः उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

दरम्यान, सोमवारी सकाळी ते घरुन शेतात गेले तेथे जेवण देखील त्यांनी केले. त्यानंतर दुपारी एक वाजता दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या शेजारी असलेल्या शेतात नांगरणीचे काम सुरु होते. त्या ठिकाणी असलेले काही शेतकरी विहीरीवर पाणी पिण्यासाठी आले असता त्यांना संजय खंदारे यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती गावात कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमख, बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मगन पवार आदींनी भेट दिली. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत संजय खंदारे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway On Raju Shetti : शक्तिपीठ महामार्गाच्या नवीन नकाशाला राजू शेट्टींचा विरोध, सांगली, कोल्हापुरातून पुन्हा आंदोलन पेटणार

MPSC Success Suraiya Desai : संसार सांभाळत स्पर्धा परीक्षेत यश; कोल्हापुरची सुरैया देसाईं महिलांमध्ये राज्यात प्रथम

Pune water supply news: पुण्यात १५ टक्के पाणी कपात टाळण्यासाठी गळती रोखण्याचा महापालिकेचा प्रयत्न; समान पाणी पुरवठा योजना व स्मार्ट मीटरवर भर

Mehkar Lonigavli POCSO Case: लोणी गवळी शाळेत तिसरीतील मुलींचा विनयभंग करणारा मास्तर ग्रामस्थांच्या ताब्यातून पोलिसांच्या स्वाधीन; जिल्ह्यात संतापाची लाट

Gold Price: अमेरिकेतलं १२९ टन सोनं माघारी आणलंच नाही..! एका निर्णयाने फ्रान्सची सेंट्रल बँक तोट्यातून थेट नफ्यात

SCROLL FOR NEXT