परभणी फोटो 
मराठवाडा

धक्कादायक बातमी : परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे कोरोनाने निधन

अत्यंत मनमिळावू म्हणून ओळखले जाणारे परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे शनिवारी (ता. २४) एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता कोरोनाने निधन झाले. ता. १५ एप्रिल रोजी अत्यवस्थ वाटल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : अत्यंत मनमिळावू म्हणून ओळखले जाणारे परभणी जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे शनिवारी (ता. २४) एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता कोरोनाने निधन झाले. ता. १५ एप्रिल रोजी अत्यवस्थ वाटल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे.

ता. ३१ मार्च अर्थात आर्थिक वर्षाच्या ताळेबंद अनुषंगाने त्यांनी जिल्हा कोषाधिकारी पदाची संपूर्ण दक्षता घेऊन जबाबदारी पार पाडली. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जिल्हा कोषागार कार्यालय, परभणी येथे कोषागार अधिकारी या पदी कार्यरत असलेले श्री सुनील कोंडीबा वायकर यांचा जन्म ता. दोन एप्रिल १९६८ रोजी झाला होता. ता. दोन मे १९९५ रोजी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब लेखाधिकारी या पदावर सेवेत दाखल झाले. कालांतराने त्यांना गट अ पदी पदोन्नती मिळालेली होती.

हेही वाचा - कोरोनात पाऱ्याचा कहर ः नांदेडचा पारा ४० अंशांवर; आगामी दिवस ठरणार तापदायक

त्यांच्या एकूण 26 वर्षांच्या सेवकाळामध्ये त्यांनी कोषागार कार्यालय उस्मानाबाद, बीड, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर, स्थानिक निधी लेखा बुलढाणा, जिल्हा परिषद वाशीम, जिल्हा कोषागार कार्यालय परभणी आदी ठिकाणी लेखाधिकारी, अप्पर कोषागार अधिकारी, सहाय्यक संचालक, कोषागार अधिकारी अशा विविध पदांवर सेवा बजावली. मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले श्री. वायकर हे ता. नऊ जुलै २०१९ रोजी कोषागार अधिकारी परभणी या पदी रुजू झाले होते. त्यांच्या सुस्वभावी व प्रेमळ वागणुकीमुळे ते कोषागार कर्मचाऱ्यांचे लाडके अधिकारी होते. त्यांच्या अकाली निधनाने जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी वृंद शोकाकुल झाला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT