covid 19 covid 19
मराठवाडा

Coronavirus| बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनावरील औषधांचा तुटवडा

जिल्हा रुग्णालयात साडेसहाशे तर आयटीआयमध्ये सुरु केलेल्या कोविड रुग्णालयात शंभरावर रुग्ण उपचाराखाली आहेत

सकाळ वृत्तसेवा

बीड: कोरोना उपचारासाठी (covid 19 treatment) सर्वात आवश्यक रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सचा (remdesivir) सर्वत्र तुटवडा आहेच. याशिवाय या आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या इतर औषधींचाही जिल्हा रुग्णालयात तुटवडा निर्माण झाला आहे.

जिल्हा रुग्णालयात साडेसहाशे तर आयटीआयमध्ये सुरु केलेल्या कोविड रुग्णालयात शंभरावर रुग्ण उपचाराखाली आहेत. आठ पेक्षा अधिक एचआरसीटी स्कोअर असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सची गरज असते. मात्र, या इंजेक्शन्सचा सर्वत्रच तुटवडा आहे. परंतु, यासह एमपीएस, पिझ्झो, लोमो (रक्कपातळ व्हायचे) हे तीन इंजेक्शन्स, डॉक्झीसाक्लीन, इव्हरमेक्टीन टॅब्लेट्स (कोरोना विरुद्ध), फॅबीफ्ल्यू टॅब्लेट (कोरोनावरील सर्वाधिक गुणकारी) यासह झिंकच्या गोळ्यांचाही तुटवडा आहे.

तुटवडा असल्याने रुग्णांना एखाद्या दिवशी डोस मिळतो तर दुसऱ्या दिवशी या औषधींचा डोस मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची प्रकृती गंभीर होत असल्याचे येथीलच डॉक्टरांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. एकीकडे कोरोना उपचारासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना औषधींचा तुटवडा रुग्णांच्या जिवावर उठत आहे.

स्वच्छतेचा अभाव
जिल्हा रुग्णालयातील अनेक वॉर्डांतील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता केली जात नाही. त्याचाही रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. काही वॉर्डबॉय नेत्यांच्या व बड्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याने त्यांचे कामांकडे दुर्लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

अमरीश पुरी नाही, 'हा' अभिनेता असता 'मिस्टर इंडिया'चा मोगॅम्बो; अचानक दाखवला बाहेरचा रस्ता, आजही होतोय पश्चाताप

Nashik News : 'नो पार्किंग'चे फलक फक्त शोभेचे! सिडकोमध्ये वाहने सर्रास थांबवली जातात

Wani News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वडिलांचा मृत्यू; मुलाचा आरोग्य केंद्रात आत्मदहनाचा प्रयत्न

Katraj Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादन कामाला मिळणार गती; कात्रजमधील मोजणी प्रक्रिया पूर्ण, कोंढव्यातील काम सुरु

SCROLL FOR NEXT